Sasoon Hospital News: चौकशीला किती वेळ लागेल सांगू शकत नाही? चौकशी समिती संशयाच्या फेऱ्यात

Pune Porsche Crash Case: पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये ससून हॉस्पिटलमधील दोन डॉक्टरांनी फेरफार केल्याचं समोर आलं आहे.
Sasoon Hospital Dr. Pallavi Saple
Sasoon Hospital Dr. Pallavi SapleSarkarnama

Pune Hit And Run Case News : कल्याणीनगर अपघात (Kalyaninagar Accident) प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये ससून हॉस्पिटलमधील दोन डॉक्टरांनी फेरफार केल्याचं समोर आलं आहे. यानंतर शासनाकडून या सर्व प्रकारची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून ही समिती ससूनमध्ये दाखल झाली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता याबाबतची चौकशी तातडीने करणे आवश्यक असतानाच या समितीच्या अध्यक्षांनी मात्र चौकशीला किती वेळ लागेल हे सांगू शकत नाही, असं विधान केलं आहे.

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे तपासणीसाठी दिलेले रक्ताचे नमुने (ब्लड सॅम्पल) ससून हॉस्पिटलमध्ये थेट बदलण्यात आले. ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर (Dr. Ajay Taware and Dr. Srihari Halnore) यांनी तीन लाख रूपये घेत हा उद्योग केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांनी (Police) या दोन्ही डॉक्टरांसह अन्य एका व्यक्तीला अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणात अडकलेल्या डॉक्टरांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने आता त्रिसदस्य समिती नेमली आहे. जेजे रुग्णालयाच्या डीन डॉ. पल्लवी सापळे (Dr. Pallavi Saple) यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आज चौकशीला सुरुवात झाल्यानंतर पल्लवी सापळे यांनी माध्यमांशी संवाद साधला त्या म्हणाल्या, ससून (Sasoon) मधील झालेल्या गैरप्रकारची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने समिती नेमली आहे. शासनाच्या नियमानुसार आम्ही चौकशी करत असून माहिती घेणे सुरू आहे. आम्ही त्याबाबतचे रेकॉर्ड जमा करत असून आज दिवसभर ही चौकशी सुरू राहणार आहे.

आतापर्यंत चौकशीमध्ये काय निष्पन्न झालं हे शासनाच्या नियमानुसार लगेच सांगता येणार नाही. आमच्याकडून योग्य ती कारवाई सुरू आहे. ज्या ठिकाणी हा प्रकार घडला त्या ठिकाणची साईट व्हिजिट केली असून ससूनचे अधिष्ठाता यांच्याकडून अधिक ची माहिती आम्ही गोळा करत आहोत. ही चौकशी किती वेळ चालेल हे सांगता येणार नाही. सरकारचे सीएसआरचे नियम आहेत, त्यामध्ये चौकशीचे नियम स्पष्टपणे दिले असून त्याप्रमाणे आमचे काम सुरू आहे. याबाबतचा अहवाल आम्ही लवकरच शासनाला सादर करू असं देखील त्यांनी सांगितलं.

चौकशी समिती संशयाच्या फेऱ्यात

डॉ. पल्लवी सापळे अधिकारी वादग्रस्त राहिल्या आहेत. त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Miraj Government Medical College) असताना, तसेच जेजे रुग्णालयात देखील अनेक प्रकरणात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाच्या यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांनीच हे आरोप केले आहेत. त्यामुळे चौकशी समितीचा अध्यक्ष बदलावा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली असून या समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Sasoon Hospital Dr. Pallavi Saple
Porsche Crash Case : पुण्यातील 'हिट अँड रन' केसचे पडसाद नाशिकमध्ये, काँग्रेसकडून अनोख्या निबंध स्पर्धेचं आयोजन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com