एकनाथ खडसेंविरोधात गिरीश महाजनांनी सर्व विरोधक एकत्र केले

दूध संघाच्या निवडणुकीत रावेर तालुक्यात जगदीश बढेंचा एकमेव अर्ज.
Eknath Khadse & Girish Mahajan
Eknath Khadse & Girish Mahajan
Published on
Updated on

जळगाव : जिल्हा दूध संघाच्या (Jalgaon) संचालकपदाच्या निवडणुकीसाठी (milk federation election) उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची सोमवारी छाननी करण्यात आली. मुक्ताईनगरातून आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांच्या उमेदवारीवरील हरकत फेटाळण्यात आली. त्यामुळे मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) विरुद्ध मंगेश चव्हाण यांच्यात लढत होईल. १३ जणांचे अर्ज बाद करण्यात आले. (Mandakini Khadse & MLA Mangesh Chavan contest in Muktainagar Taluka)

Eknath Khadse & Girish Mahajan
तरुणीच्या दुचाकीत सापडला चक्क गावठी कट्टा!

रावेर तालुक्यातून जगदीश बढे याचा एकमेव अर्ज आहे. पारोळ्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांच्यात लढत होणार आहे.

Eknath Khadse & Girish Mahajan
राज्याचे सहकार मंत्री नेत्यांसाठी की जनतेसाठी?

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत यंदा टोकाचा राजकीय संघर्ष दिसेल अशी स्थिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे वर्चस्व असलेल्या या संघाची निवडणूक सध्या अंतिम चरणात आहे. यामध्ये भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ शिंदे गटाचे दुसरे मंत्री गुलाबराव पाटील यांसह विविध खडसे विरोधक नेत्यांची मोट बांधली आहे. त्यामुळे खडसे आणि त्यांच्या विरोधकांत आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.

जळगाव जिल्हा दूध संघासाठी एकूण ३८२ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. त्यात १८ जणांच्या अर्जावर हरकती आल्या होत्या. त्या अर्जांची सोमवारी जिल्हा निवडणूक अधिकारी संतोष बिडवई यांच्यासमोर सुनावणी झाली.

चव्हाण, पाटलांवरील हरकती फेटाळल्या

आमदार मंगेश चव्हाण यांच्या अर्जावर मंदाकिनी खडसे यांनी हरकत घेतली होती. एका तालुक्यातील उमेदवाराला दुसऱ्या तालुक्यात उमेदवारी अर्ज दाखल करता येत नाही, अशी त्यांची हरकत होती. मात्र, ही हरकत फेटाळण्यात आली. अशीच हरकत वाल्मीक पाटील यांच्या अर्जावर घेतली होती, तीही फेटाळण्यात आली.

संजय पवार यांच्या अर्जावर घेण्यात आलेली हरकतही फेटाळण्यात आली. छाननीत १३ उमेदवारांचे अर्ज त्रुटींमुळे बाद करण्यात आले. बाद झालेले उमेदवारी अर्ज असे : संजय भिकारी पाटील (चाळीसगाव), उषाबाई विश्‍वास पाटील (पाचोरा), मिलिंद दयाराम वायकोळे (रावेर), दगडू धोंडू चौधरी (एरंडोल), रवींद्र दंगल पाटील (चोपडा), विनोद रामदास तराळ (मुक्ताईनगर), ठकसेन भास्कर पाटील, गीता शिरीष चौधरी (रावेर), पुष्पाबाई समाधान पाटील (इतर मागास), संदीप मधुकर पाटील (भडगाव), संदीप मधुकर पाटील (इतर मागास), सुभाष एकनाथ सरोदे (रावेर), रामचंद्र संतोष मोरे (एरंडोल).

अर्ज माघारीस २९ पर्यंत मुदत

उमेदवारी अर्ज माघार घेण्यास प्रारंभ झाला आहे. एरंडोल तालुक्यातून ईश्‍वर सुभाष पाटील यांनी अर्ज मागे घेतला आहे. २९ नोंव्हेबरपर्यंत अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com