Girish Mahajan Politics: जामनेर मध्ये महाजन विरुद्ध खोडपे, प्रचारात भरतोय रंग!

Dilip Khodpe Starts Election Campaign: भारतीय जनता पक्षाचे संकट मोचक, मंत्री गिरीश महाजन यंदा सातव्यांदा मतदारांचा कौल घेत आहेत.
Dilip Khodpe & Girish Mahajan
Dilip Khodpe & Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Mahajan Vs Khodpe: जामनेर विधानसभा मतदारसंघात प्रचाराला सुरुवात झाली. आहे. विधानसभा निवडणूक यंदा रंगतदार होणार याची चिन्हे या प्रचारातून दिसत आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी पक्ष संघटित करण्यावर भर दिला आहे.

जळगाव जिल्हा गेली काही वर्ष भाजपचा बालेकिल्ला आहे .त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आव्हान दिले आहे. शिवसेनेची संगत यंदा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी आहे. त्यामुळे जळगावच्या या बालेकिल्ल्यात विधानसभा निवडणुकीत चांगली रंगतदार लढत पाहायला मिळेल, असे सध्याचे चित्र आहे.

जळगाव जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघांमध्ये ही स्थिती आहे. त्यामुळे सगळ्यांनाच यंदाच्या निवडणुकीत काय होईल, याची उत्सुकता आहे. या निमित्ताने भाजपमधील नाराज मंडळी तसेच महाजन यांचे विरोधक सक्रीय झाले आहेत.

राज्याचे ग्राम विकास मंत्री महाजन हे राज्यातील भाजपचे एक प्रमुख नेते आहेत. त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. त्याला दुसरे एक महत्त्वाचे कारण घडले आहे. भाजपचेच व मोठा संपर्क असलेले एक नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी घेऊन महाजन यांना आव्हान देणार आहेत.

Dilip Khodpe & Girish Mahajan
Anil Kadam Politics: उद्धव ठाकरेंनी अनिल कदम यांच्या मर्मावरच बोट ठेवले, उमेदवारीत भाऊबंदकीचा अडसर?

ही निवडणूक एक प्रकारे भाजपला भाजपच्या पद्धतीने आव्हान देणारी ठरण्याची चिन्हे आहेत. त्यात गेली अनेक वर्षे गिरीश महाजन यांचे निवडणूक तंत्र जवळून अनुभवलेले व त्यांच्याच खांद्याला खांदा लाऊन लढणारे भाजपच्या पराभवासाठी काम करणार आहेत. त्याचा धसका भाजपने घेतल्याचे जाणवते.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी नुकताच श्री महाजन यांच्यावर गंभीर आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या प्रवेशा आधी गेली सहा महिने त्यांचा व त्यांच्या समर्थकांचा जामनेर मतदारसंघात बारीक अभ्यास सुरू होता. गेल्या निवडणुकीत देखील श्री खोडपे हे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत होते.

गेल्या निवडणुकीत मात्र ऐनवेळी श्री महाजन यांनी त्यांची मनधरणी केली. यंदाही श्री खोडपे यांना रोखण्यासाठी भाजपच्या विविध नेत्यांनी विविध प्रयोग केले. मात्र ते यशस्वी होऊ शकलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने महाविकास आघाडीतर्फे श्री खोडपे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

Dilip Khodpe & Girish Mahajan
Girish Mahajan : महाजनांचे आव्हान अन् प्रश्नांची सरबत्ती; खडसे चॅलेंज स्वीकारत काय उत्तर देणार?

श्री खोडपे यांनी सध्या प्रचार देखील सुरू केला आहे. श्री खोडपे हे सामान्य कार्यकर्ते आणि नागरिकांची संपर्क असलेले नेते आहेत. त्यांनी प्रचार सुरू केल्यावर एका अपंग कार्यकर्त्याने त्यांना आर्थिक मदत दिली. दुसऱ्याच दिवशी एका गावात त्यांना अकरा हजार रुपयाची देणगी जाहीर करण्यात आली.

ही देणगी थेट पुणे येथील श्रीकांत शिवाजी पाटील यांनी पाठविली होती. अप्रत्यक्षरीत्या `एक नोट एक बोट` अशी मोहीम यंदा मातब्बर आणि मंत्री महाजन यांच्या विरोधात उभी राहण्याची चिन्हे आहेत. विविध गावांमध्ये सबंध मतदार संघात असा संदेश पोहोचविण्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा प्रयत्न आहे.

आगामी निवडणुकीत सातव्यांदा मतदारांचा कौल घेणारे महाजन विरुद्ध एक सामान्य कार्यकर्ता अशी ही लढत आहे. भाजपमध्ये राजकारणाचा बळी ठरलेल्या खोडपे यांच्या निमित्ताने ही लढत विरोधी पक्षांना बळ देऊन गेली.

यात वेगळ्या प्रचाराची झलक गेल्या आठवडाभर मतदार अनुभवत आहेत. त्यामुळे जामनेर मतदार संघाची निवडणूक भाजपसाठी सबंध राज्यातील नेत्यांना इंटरेस्ट निर्माण करणारी ठरेल. पक्षाचे जळगाव जिल्ह्यातील विविध सत्ता स्थानांवर प्रभुत्व आहे.

तीन मंत्री आणि सात आमदार अशी यंत्रणा महाजन यांच्यासाठी राबणार आहे. त्या विरोधात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष खोडपे कशी यंत्रणा उभी करतात, हा कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्सुकतेचा विषय आहे. एकंदरच सातव्यांदा मतदारांचा कौल घेणाऱ्या भाजपच्या संकटमोचक मंत्री महाजन यांची यंदाची निवडणूक रंगतदार ठरणार हे नक्की.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com