Girish Mahajan Politics : चारोस्करांच्या हाती कमळ सोपवताना गिरीश महाजनांनी टाकला बॉम्ब, तिकडे नरहरी झिरवाळांना फुटला घाम
Nashik Politics : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ग्रामीण भागात शिरकाव केला असून पुन्हा इनकमिंगचा धडाका सुरु केला आहे. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात भाजपने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का दिला आहे. आज दिंडोरीचे माजी आमदार रामदास चारोस्कर आणि सुनिता चारोस्कर यांनी गिरीश महाजनांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
सुनिता चारोस्कर यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत चारोस्कर यांचा पराभव झाला होता. परंतु आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आता चारोस्करांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने दिंडोरी तालुक्यात भाजपची ताकद आणखी वाढली आहे.
दरम्यान या प्रवेश सोहळ्यात गिरीश महाजन यांनी केलेल्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे. दिंडोरीत पुढच्या वेळी भाजपचा आमदार द्या असे खळबळजनक विधान महाजन यांनी केले. दिंडोरी विधानसभेत सध्या महायुतीतील घटक पक्षाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ आमदार आहेत. महायुतीच्या जागा वाटपात ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे. पण पुढच्या वेळी भाजपचा आमदार द्या...या गिरीश महाजनांच्या विधानाने तालुक्यात एकच खळबळ उडवून दिली आहे.
त्यामुळे पुढच्या वेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मतदारसंघावर भाजप दावा सांगते की काय? अशा चर्चा सुरु झाल्या आहे. भाजप दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना शह देण्याची तयारी तर करत नाही असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे गिरीश महाजनांचे वक्तव्य अनेक अर्थाने घेतले जात आहे. यावर स्वत झिरवाळ काही प्रतिक्रिया देतात का हेही पाहावे लागणार आहे.
दरम्यान रामदास चारोस्कर साहेब हा तुमचा शेवटचा प्रवेश आता कुठ जावू नका, असा मिश्कील टोला गिरीश महाजन यांनी रामदास चारोस्कर यांना लगावला. लोकसभेला थोडा फटका बसला पण विधानसभेला यश मिळाले. आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी काम सुरू करा असे आवाहन महाजन यांनी केले. त्यावर रामदार चारोस्कर म्हणाले, राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला भाजप हा एकमेव पर्याय वाटला आणि त्यामुळे आज आम्ही सर्व भाजपत प्रवेश करत आहोत. पक्ष जी जबाबदारी देईल, ती आम्ही प्रामाणिकपणे पार पाडू.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

