Devendra Fadanvis : कोण देवेंद्र फडणवीस? असं विचारणाऱ्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांना गिरीश महाजनांनी झाप झाप झापलं..

Girish Mahajan slams Harshvardhan Sapkal : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर 'वोट चोरीचा' आरोप केला आहे. त्यावरुन सध्या राजकीय वातावरण तापलं आहे.
Girish Mahajan & Devendra Fadanvis
Girish Mahajan & Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics : मागील काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी हे निवडणूक आयोगावर 'मत चोरी'चे आरोप करत आहेत. त्यांच्या नेतृत्वात लोकसभा ते निवडणूक आयोग असा मोर्चा नुकताच काढण्यात आला. त्यावरुन राहुल गांधी यांच्याकडे कोणतेही पुरावे नाही, ते हवेत गोळीबार करतात अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

त्या टीकेवरुन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पत्रकाराने विचारलं असता त्यांनी कोण देवेंद्र फडणवीस? असा सवाल उपस्थित केला.

पुण्यात कॉंग्रेसच्या वतीने झालेल्या वोटचोरी कॅम्पेन वेळी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे माध्यम प्रतिनिंधीशी बोलत होते. यावेळी कोण देवेंद्र फडणवीस? त्यांच्या मतांना आम्ही महत्व देत नाही. आम्ही आमचे प्रश्न निवडणूक आयोगाला विचारत आहोत. तुम्हाला निवडणूक आयोगाने वकिल नेमलं आहे का? की निवडणूक आयोगाच्या मतांच्या चोरीत आपण दलाल आहात याचा खुलासा त्यांनी आधी करावा अशी टीका सपकाळ यांनी फडणवीसांवर केली.

सपकाळ पुढे म्हणाले, निवडणूक आयोगाला वाचविण्याचा फडणवीस केविलवाणा प्रयत्न करत आहे. परंतु लोकशाहीचा हा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यात लुडबुड करु नये असा सल्ला सपकाळांनी दिला.

Girish Mahajan & Devendra Fadanvis
Uday Samant : नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेच व्हावेत, 'हीच सामंताची इच्छा' पण म्हणाले निर्णय..

दरम्यान यावरुन भाजप नेते गिरीश महाजन यांनी सपकाळ यांचा पाणउतारा केला आहे. महाजन म्हणाले, देवेंद्र फडणवीस साहेबांना कोण ओळखत नाही. राज्यातील सर्वात तरुण महापौर ते होते. सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून या राज्याने त्यांना बघितलं. सहा टर्म झाले ते सतत निवडून येत आहेत. त्यांचे कार्य, कामाचा आवाका मुख्यमंत्री म्हणून तीन-तीन टर्म लोकांनी बघितलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बच्चा बच्छा फडणवीसांना ओळखतो असं महाजन म्हणाले.

आणि सपकाळ विचारता कोण देवेंद्र फडणवीस ? हे हास्यास्पद आहे. खरंतर कोण सपकाळ? हे जर लोकांना विचारलं.तर मला वाटतं किती लोक त्यांना ओळखतील हा प्रश्नच आहेत. एकदा तुम्ही आमदार झालात आणि अपघाताने कॉंग्रेसचे अध्यक्ष झालात. आणि तुम्ही विचारतात कोण देवेंद्र फडणवीस, मी त्यांना ओळखत नाही. मला वाटतं यापेक्षा मोठं हास्यास्पद विधान असूच शकत नाही.

Girish Mahajan & Devendra Fadanvis
Shiv Sena Politics : शिवसेनेला भाजपपेक्षा राष्ट्रवादीवर भरवसा, स्थानिक निवडणुकीसाठी डोक्यात शिजला वेगळा प्लॅन..

सपकाळ यांनी जबाबदारीने बोलावं. ते कॉंग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्या कॉंग्रेसमध्ये कुणी राहायला तयार नाही, त्यामुळे तुम्ही आधी तुमचा पक्ष सांभाळा असे काही तरी फालतू विधानं करु नका असं महाजन यांनी सपकाळ यांना झापलं आहे. तसेच राहुल गांधी जे काही करत आहे ती कॉमेडी करत आहे अशी खिल्ली महाजनांनी उडवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com