Girish Mahajan Politics: गिरीश महाजन म्हणतात, "नाशिक शहरातील गुंडांना जास्त माज आला आहे"

Girish Mahajan Says Nashik, Criminals Are Getting Out of Control: राजकीय पक्षांतील लोकांची गुन्हेगारी खपवून घेणार नाही, शहर गुन्हेगारांपासून मुक्त करण्याचा निर्धार.
Devendra-Fadanvis-Girish-Mahajan
Devendra-Fadanvis-Girish-MahajanSarkarnama
Published on
Updated on

Nashik Crime News: नाशिक शहरातील गुन्हेगारी शिगेला पोहोचली आहे. सामान्य नागरिकांना गुंड वेठीस धरतात. याचे रसभरीत वर्णन आज दस्तूर खुद्द जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीच केले.

नाशिक शहरात पोलीस आयुक्तांनी विविध राजकीय पक्षांतील गुन्हेगारांविरुद्ध मोहीम उघडली आहे. यामध्ये सत्ताधारी भाजप आणि महायुतीचा घटक पक्ष आरपीआय पक्षाचे नेते आघाडीवर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कारवाईसाठी आयुक्तांना सूचना द्याव्या लागल्या.

नाशिक शहरातील गुंडांना जास्त माज आला आहे, असे मंत्री गिरीश महाजन यांनी आज सांगितले. शहरातील गुन्हेगारांना वचक बसविण्याचे काम पोलीस करतील. या संदर्भात कोणताही राजकीय हस्तक्षेप केला जाणार नाही.

Devendra-Fadanvis-Girish-Mahajan
Girish Mahajan Politics: गुन्हेगारांना पक्षातून काढणार का? या प्रश्नावर गिरीश महाजन यांचे कानावर हात!

विशेष म्हणजे शहरातील गुन्हेगारांची मजल कुठे पोहोचली आहे, याचे वर्णन खुद्द महाजन यांनी केले. लोकांच्या जमिनी आणि बंगले हडप केले जात आहेत. या गुन्हेगारीमुळे लोकांच्या अंगावर कपडे देखील राहिले नाही, अशी विदारक स्थिती आहे.

Devendra-Fadanvis-Girish-Mahajan
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या अडचणी वाढणार? इंदिरा गांधींनी सुद्दा सावरकरांना म्हटलं होतं 'वीर'

शहरातील रस्त्यांवर रात्री, अपरात्री किरकोळ कारणावरून नागरिकांना वेठीस धरले जाते. गुन्हेगारांची मजल सहज खून करण्यापर्यंत गेली आहे. प्रसिद्धीसाठी अनेक गुन्हेगार स्वतःचे फ्लेक्स लावतात.

शहर गुन्हेगारी आणि गुंडगिरीमुक्त करण्याचा निर्धार भाजपने केला आहे. भाजपला नाशिक शहर निर्भय वातावरण असलेले हवे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः त्यासाठी पुढाकार घेतला, असे महाजन म्हणाले.

गुंड आणि गुन्हेगार कोणत्याही पक्षाचा असो, त्याला सोडले जाणार नाही. गुन्हेगारांवर अत्यंत कठोर कारवाई केली जाईल. नाशिकला गुंडांपासून मुक्त करण्यासाठी पोलिसांना स्पष्ट सूचना करण्यात आले आहेत.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक शहरातील गुन्हेगारीचे धक्कादायक वर्णन आणि घटना यावेळी व्यक्तींचा उल्लेख टाळून केल्या. विशेष म्हणजे या जिल्ह्याची सुत्रे मंत्री महाजन यांच्याकडेच होती. काही काळ ते पालकमंत्री देखील होते. त्यामुळे त्यांचे वक्तव्य नागरिकांसाठी चर्चेचा विषय नक्कीच आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com