Girish Mahajan News: धुळे महापालिकेत भाजपचे टार्गेट ‘५० प्लस’

Girish Mahajan said, forget what happens in history- नवनियुक्त शहराध्यक्ष आणि खासदार डॉ. सुभाष भामरे यांचे समर्थक गजेंद्र अंपळकर यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन केले.
Girish Mahajan at Dhule
Girish Mahajan at DhuleSarkarnama
Published on
Updated on

Dhule BJP News : भाजप पदाधिकाऱ्यांनी धुळ्यात मागे काय झाले, यापेक्षा पुढे आणखी चांगले काम कसे होईल यावर भर ठेवावा, असे आवाहन भाजप नेते, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले. (BJP start prepration for Dhule Municiple election)

धुळे शहरात (Dhule) भाजप (BJP) पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाला बहुमत मिळविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Girish Mahajan at Dhule
BJP MP Bhamre on Manipur Issue: भाजप खासदार भामरेंच्या मतदारसंघात आदिवासींचा एल्गार!

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात शक्तीप्रदर्शन केले. यावेळी कोणत्याही स्थितीत महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकेल असा विश्वास यावेळी व्यक्त करीत, शहराच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेच्या उद्‌घाटनाची तारीख लवकर कळवा, असेही मंत्री महाजन यांनी सांगतिले.

खासदार डॉ. सुभाष भामरे यांचे समर्थक अंपळकर यांची भाजपच्या शहर-जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागली. यानंतर त्यांनी खासदारांच्या साथीने जामनेर (जि. जळगाव) येथे चार दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर शक्तिप्रदर्शन केले.

Girish Mahajan at Dhule
Sambhaji Bhide Controversy: सरकारला संभाजी भिडेंचा एवढा पुळका का?

आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाला ‘५० प्लस’ जागा मिळवून देऊ, असा संकल्प भाजपचे नवनियुक्त शहराध्यक्ष श्री. अंपळकर यांनी सोडला. भाजपचे येथील ३० ते ३२ नगरसेवक व कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

प्रामुख्याने माजी महापौर जयश्री अहिरराव, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, अनिल नागमोते, माजी स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, नगरसेवक हिरामण गवळी, हर्षकुमार रेलन, वंदना भामरे, सुरेखा उगले, चेतन मंडोरे, बंटी मासोळे, संजय पाटील, प्रवीण अग्रवाल आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com