मोठी बातमी : माजी कॅबिनेट मंत्री जयप्रकाश मुंदडा यांच्यावर गुन्हा

डॉ. जयप्रकाश मुंदडा (Jaiprakash Mundada) यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jaiprakash Mundada
Jaiprakash Mundadasarkarnama

हिंगोली : राज्याचे माजी सहकार कॅबिनेट मंत्री, डॉ. जयप्रकाश मुंदडा (Jaiprakash Mundada) यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोलीच्या वसमत शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विराजमान करताना आयोजकांनी डीजे ढोल पथक व फुलांची उधळण करत हजारोंच्या संख्येने मिरवणूक काढल्याप्रकरणी वसमत पोलिसांनी आता आयोजकांसह चारशे ते पाचशे जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

या मिरवणुकीत या आधी देखील वसमत विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांनी छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ घोड्यावर चढून पुष्पवृष्टी केली होती, समाज माध्यमांसह सर्वच स्तरातून याचा निषेध झाल्यानंतर आमदार नवघरे यांनी दिलगिरी व्यक्त करत अनावधानाने चूक झाल्याची सांगत माफी मागितली होती, त्यानंतर आता छत्रपती शिवरायांच्या वसमत येथील मिरवणुकीतील आयोजक व सहभागी शिवप्रेमींना वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याच्या निषेधार्थ आज हिंगोलीत शिवसेनेने , जिल्ह्यातील सर्व शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची शासकीय विश्रामगृहात बैठक बोलावली आहे, या बैठकीत काय निर्णय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे

Jaiprakash Mundada
किती निष्ठावान शिवसैनिक मंत्रिमंडळात आहेत ? भाजपचा ठाकरेंना सवाल

हिंगोलीच्या वसमत शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) घोड्यावर चढून नवघरे यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. मात्र चूक लक्षात येताच त्यांनी माफीही मागितली. माफी मागताना त्यांना अश्रू अनावर झाले. या घटनेचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नवघरे यांच्या या गंभीर चुकीवर सर्वत्र टीका होत आहे.

“मी अठरा पगड जातीला मानणारा, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा कार्यकर्ता आहे. मी येथे होतो तेव्हा माजी आमदार मुंदडा साहेब हे देखील तिथे होते. त्यांनीच मला घोड्यावर वर चढवलं. तुम्ही पहिल्यांदा हार घाला म्हणाले, त्यानंतर डॉ. जयप्रकाश मुंदडाही वर चढले. पण मला एकट्याला बदनाम केलं जात आहे. माझ्या चूकीसाठी मी जाहीर माफी मागतो. पण मला बदनाम करु नका. तुम्हाला वाटत असेल तर मी पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमातही दाखल होणार नाही,” असं राजू नवघरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com