एकनाथ खडसे माझ्यापेक्षा सिनीअर नाहीत!

मी एकनाथ खडसेंच्याही आधी पक्षात होतो, असा दावा गिरीश महाजन यांनी केला.
Girish Mahajan & Eknath Khadse
Girish Mahajan & Eknath Khadsesarkarnama
Published on
Updated on

नाशिक : माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना सध्या काम नाही. घरी एकटेच बसून असल्याने त्यांची मानसिकता बिघडली आहे. मी पैसे घेतल्याचा पुरावा त्यांनी द्यावा, असे आव्हान माजी मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी दिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खडसे-महाजन वाद उफाळून आल्याचे चित्र आहे.

Girish Mahajan & Eknath Khadse
निवडणूक लांबणीवर पडली तरी गाफील राहू नका!

भारतीय जनता पक्षाच्या नाशिक प्रभारीपदी नियुक्तीनंतर प्रथमच शहरात आले असताना श्री. महाजन यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. खडसे यांनी केलेल्या आरोपांच्या अनुषंगाने त्यांनी आपण खडसेंच्या म्हणण्याला फार महत्व देत नसल्याचे सांगितले.

Girish Mahajan & Eknath Khadse
शक्कल की बेअक्कल... यूट्यूबच्या माध्यमातून फुलविला अफूचा ‘मळा’

ते म्हणाले, की त्यांची मानसिकता बिघडली आहे. खडसे माझ्यापेक्षा सिनिअर नाही. त्यांच्या आधी मी भाजपमध्ये आहे. उमेदवारी लवकर मिळाली, म्हणून त्यांना सिनिअर म्हणता येणार नाही. सर्वांनाच ते माझ्यामुळे मोठे झाल्याचे सांगत फिरत असल्याची टिकाही त्यांनी या वेळी केली.

दरम्यान, राज्य सरकारवर टिका करताना ते म्हणाले, सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. लोकांच्या प्रश्‍नांशी सरकारला देणे-घेणे नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना आज नवाब मलिक जिंदाबादच्या घोषणा देत आहे, हे दुर्दैवी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यासंदर्भात शरद पवार यांनी केलेले आरोप राजकीय आहेत. कुठल्याही अर्धवट कामांचे उद्‌घाटन होत नसते. युक्रेनमधून विद्यार्थ्यांना मायदेशात आणले जात आहे. मात्र, केंद्र सरकार काहीच करत नाही, हे दाखविण्याचा विरोधकांकडून प्रयत्न आहे. सध्या राज्यपाल हटाव मोहीम सुरु आहे. परंतू राज्यपालांची नेमणूक शिवसेना, राष्ट्रवादीच्या हातात नाही. मनासारखे करा अन्यथा हटवा अशी महाविकास आघाडीची भुमिका असल्याचेही त्यांनी या वेळी नमुद केले.

राऊत राष्ट्रवादीचे प्रवक्ते

फोन टॅपिंगच्या आरोपांसंदर्भात बोलताना महाजन म्हणाले, राऊत यांच्या बोलण्याला किंमत नाही. राज्यात युतीची सत्ता होती, तेव्हा राऊत गायब होते. त्यावेळी त्यांना कोणी ओळखतही नव्हते. राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून ते बोलत असून, तेव्हापासून त्यांना लोक ओळखतात. भाजप-सेना युती तोडण्यामागे संजय राऊत यांचा पुढाकार आहे. फोन टॅपिंगचे पुरावे असल्यास सादर करावे, असे आवाहन करताना राऊत यांच्या जिभेला हाड नसल्याची टिकाही त्यांनी केली. रश्मी शुक्लांच्या चौकशीसंदर्भात पुरावे समोर आले तरच अर्थ असल्याचे ते म्हणाले.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com