शक्कल की बेअक्कल... यूट्यूबच्या माध्यमातून फुलविला अफूचा ‘मळा’

चोपडा तालुक्यात युवकाने केली तीन एकर शेतावर अफूची लागवड.
narcotin crop farm in Jalgaon
narcotin crop farm in JalgaonSarkarnama
Published on
Updated on

चोपडा : तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवनवी क्रांती होत असली तरी याचे अनेक दुष्परिणामदेखील आपण बघत असतो. यूट्यूबवरील (Youtube) विविध व्हिडिओ पाहून कुणी नृत्यकला शिकत, कुणी अनेक पाककला शिकत, तर कुणी शिक्षणासाठी त्याचा वापर करीत असतो. परंतु तालुक्यातील घोडगाव येथे मात्र यूट्यूबच्या माध्यमातून चक्क अफूची (Narcotin) शेती फुलविली आहे. पोलिसांना याची भनक लागताच अफूच्या शेतमालकाला ताब्यात घेत गुन्हा (police) नोंदविण्यात आला आहे.

narcotin crop farm in Jalgaon
निवडणूक लांबणीवर पडली तरी गाफील राहू नका!

तालुक्यातील घोडगाव शिवारातील तीन एकर क्षेत्रांवर वाळकी येथील शेतकरी प्रकाश सुधाकर पाटील (वय ३८) याने प्रतिबंध असलेल्या अफूच्या पिकाची लागवड केली असल्याने शुक्रवारी (ता. ४) चोपडा ग्रामीण पोलिसांनी शेतावर धाड टाकून प्रकाश पाटील याला ताब्यात घेतले आहे. कारवाई करून कोट्यवधीच्या घरात किंमत असलेले अफूचे पीक कापून पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

narcotin crop farm in Jalgaon
एकनाथ खडसे सतततच्या पराभवाने खचले आहेत!

प्रतिबंध असलेल्या अफूच्या पिकाची एवढ्या मोठ्या प्रमाणात लागवड करण्याची जिल्ह्यातील पहिलीच घटना असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. यासोबत अन्य कुठे अफूची लागवड केली आहे का, याचा शोध पोलिस करीत आहेत. या वेळी पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी अफूच्या शेताला भेट दिली. संशयिताने अफूच्या शेताच्या चतुःसीमेवर मक्याची लागवड केलेली होती.

यावरून शुक्रवारी पोलिसांनी मोठ्या फौजफाट्यासह अफूच्या शेताचा तलाठीकडून पंचनामा करण्यात आला. त्यानंतर मजुरांच्या सहाय्याने पिके कापण्यात येऊन त्याचे मूल्य काढण्यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या वेळी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधीक्षक भास्कर पाटील, ग्रामीणचे पोलिस निरीक्षक देवीदास कुनगर, पोलिस उपनिरीक्षक अमर वसावे, आर्थिक गुन्हे शाखा, पुरवठा विभागाचे देवेंद्र नेतकर, मंडळ अधिकारी आर. आर. महाजन, तलाठी एस. एस. महाजन उपस्थित होते.

यूट्यूब चॅनलची मदत

प्रकाश पाटील याने यूट्यूब चॅनलवरून अफूची लागवड, त्याचा उपयोग व किंमत याविषयी माहिती घेऊन तीन एकरमध्ये अफूची लागवड केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत प्रकाशच्या मोबाईलमध्ये यूट्यूबवर अफूची माहिती सर्च केल्याचे आढळून आले आहे.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com