Eknath Khadse On Girish Mahajan : '' बांधकाम विभागातील भ्रष्टाचार दडपण्यासाठी महाजनांचा दबाव...'': खडसेंचा खळबळजनक आरोप

Jalgaon Politics : '' बांधकाम मंत्र्यांसह सरकारने त्यावेळी पळ काढला.''
Eknath Khadse and Girish Mahajan
Eknath Khadse and Girish MahajanSarkarnama

Jalgaon : राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ज्या स्तरावरुन चौकशी सुरु आहे, त्या चौकशीतही तथ्य आढळून आले आहे. त्यासंबंधीचा अहवाल आपल्याकडे आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिवांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते बैठकीत असल्याचे सांगण्यात आले.

यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांना संपर्क केला असता त्यांनी या तक्रारींच्या संदर्भात कारवाई, चौकशी करु नये म्हणून गिरीश महाजनांचा(Girish Mahajan) दबाव असल्याची कबुली आपल्याजवळ दिली, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसेंनी केला आहे.

Eknath Khadse and Girish Mahajan
Ajit Pawar On Yogesh Kshirsagar : बीडमधून योगेश क्षीरसागरांची एन्ट्री अन् अजितदादांचे नवे संकेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि नेते एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse)जळगावात पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचारावर भाष्य करतानाच मंत्री गिरीश महाजनांवर गंभीर आरोप केला.

खडसे म्हणाले, अतिरिक्त दराच्या निविदा स्वीकारणे, मर्जीतील मक्तेदारांना कामे देणे, निकृष्ट दर्जाची कामे करणे, क्षमता नसलेल्या मक्तेदारांच्या निविदा स्वीकारणे अशा प्रकारांमधून सार्वजनिक बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी आपण संबधित मंत्री, सचिवांकडे केल्या आहेत. त्यात तथ्यही आढळून आले असल्याचेही खडसे म्हणाले.

Eknath Khadse and Girish Mahajan
Sharad Pawar News : कोल्हापूर तापलं ! पवारांच्या सभेची बॅनरबाजी अन् मुश्रीफांना टोलेबाजी ; खोपडेंची गद्दारी...

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कामांना खडसेंनी केलेल्या तक्रारींमुळे स्थगिती मिळाल्याचा आरोप करत जिल्हा नियोजन समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत शिरीष चौधरी वगळता अन्य आमदारांनी खडसेंच्या निषेधाचा ठराव संमत केला होता. त्यासंदर्भात त्यांनी आपली भूमिका मांडली.

यावेळी बोलताना खडसे म्हणाले, जळगाव जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागात गेल्या १५ वर्षांपासून प्रशांत सोनवणे नामक अभियंता कार्यरत आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध कामांमध्ये सोनवणेंनी मोठ्या प्रमाणात अनियमतता व बेकायदा पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवून गैरव्यवहार केला आहे.

यासंदर्भात सुभाष दिनकर पाटील यांनी केलेल्या तक्रारींची चौकशी होऊन त्यात तथ्य आढळल्याने सोनवणेंचे नाशिक येथे बदली करण्यात येऊन त्या जागी श्रीमती रुपा गिरासे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी विदेश दौऱ्यासाठी अर्जित रजा घेतल्यानंतर जळगावचा प्रभारी कार्यभार सोनवणेंकडे पुन्हा देण्यात आला. नंतर त्यांनी तो सोडलाच नाही. राजकीय दबावातून सोनवणेंची पुन्हा जळगावातच कायमस्वरुपी बदली करण्यात आली.

कोट्यवधींचा गैरव्यवहार...

जळगावात पदभार स्वीकारल्यानंतर सोनवणे यांनी पुन्हा या विभागात कोट्यवधींचा गैरव्यवहार सुरु झाला. मर्जीतील मक्तेदारांना कामे देणे, जादा दराच्या निविदा स्वीकारणे यासह अनेक प्रकार सुरु केले आहेत. या सर्व गैरव्यवहारांच्या संदर्भात आपण नुकत्याच झालेल्या अधिवेशनात लक्षवेधी मांडली. मात्र, बांधकाम मंत्र्यांसह सरकारने या लक्षवेधीवरील चर्चेपासून पळ काढला. तीन दिवस मंत्री उत्तर द्यायलाही आले नाहीत असा आरोपही खडसे यांनी केला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com