Girish Mahajan News : दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी गिरीश महाजन यांच्या सूचना!

Government administratation shall take a drive for survey-मंत्री गिरीश महाजन यांनी पीकविम्यासाठी सर्वेक्षण करण्यासाठी प्रशासनाला सूचना केल्या.
Girish Mahajan
Girish Mahajan Sarkarnama
Published on
Updated on

Dhule News : काँग्रेससह विविध विरोधक दुष्काळामुळे त्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाला देखील जाग आल्याचे चित्र आहे. याबाबत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बैठक घेऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Guardian Minister Girish Mahajan instruts administration for draught)

धुळे (Dhule) जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे दुष्काळाची स्थिती असल्याने काँग्रेस, (Congress) शिवसेना (Shivsena) तसेच विरोधी पक्षांनी याबाबत राज्य सरकारला धारेवर धरले आहे. आंदोलन होत असल्याने पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनीही सूचना केल्या.

Girish Mahajan
Dhule Congress: दुष्काळग्रस्तांसाठी काँग्रेसचा सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम!

दुष्काळाच्या प्रश्नावर राजकारण तापले आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाने याबाबत दोन दिवसांचा अल्टीमेटम प्रशासनाला दिला आहे. शिवसेनेने (ठाकरे गट) यांनीही आंदोलन केले होते. विविध राजकीय पक्ष याबात पाठपुरावा करीत असल्याने दुष्काळाच्या प्रश्नावरील राजकारण तापले आहे.

याअनुषंगाने पालकमंत्र्यांनी देखील सूचना केल्या आहेत. जिल्ह्यात काही भागांत २१ ते २३ दिवसांपासून पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटली असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यांना धीर देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सर्वेक्षण करून पीकविम्यासाठी अधिसूचना निर्गमित करण्याची कार्यवाही जलदगतीने केली जाईल.

Girish Mahajan
Cabinet Meeting News : राज्य मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्यात ? विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मोठ्या निर्णयांची शक्यता !

ते म्हणाले, की जिल्ह्यात पावसाचा खंड पडल्याने खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटली. शेतकरी आर्थिक संकटास सामोरे जात आहे. राज्य सरकारच्या सर्वसमावेशक प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील दोन लाख ४६ हजार ८४७ शेतकऱ्यांनी एक रुपया भरून कपाशी, उडीद, मूग, सोयाबीन, ज्वारी, मका आदी पिकांचा विमा काढला आहे. निकषांनुसार २५ टक्के नुकसानभरपाईची रक्कम अग्रिम स्वरूपात देण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यातील पावसाचा अहवाल संकलित करून साह्य करावे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com