लेटर बॅाम्ब फेम दीपक पांडेंना शासनाच्या नोटीसचा शॅाक!

महसूल विभागावर श्री. पांडे यांनी टिका करणारे पत्र दिले होते.
Deepak Pande
Deepak PandeSarkarnama

नाशिक : महसूल (Revenue) न्यायदंडाधिकारी यांना आरडीएक्स संबोधणारे पत्र देणारे पोलिस आयुक्त दीपक पांडे (Deepak Pande) यांना अखेर राज्य शासनाने (Maharashtra Government) विभागाने शॅाक दिला आहे. आज राज्य शासनाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे बोलले जाते. याबाबत प्रशासनाशी संपर्क होऊ शकला नाही.

Deepak Pande
डीएनए चेक करो, सलीम शेख तुम मुसलमान नही हो सकते!

दरम्यान नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे दोन दिवसांपासून रजेवर आहेत. ते सध्या मुंबईत आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. महसूल विभागाने श्री. पांडे यांच्या विरोधात कारावईसाठी ११ एप्रिलचा अल्टीमेटम दिला होता.

Deepak Pande
भारती पवारांचा गोदावरी एक्सप्रेसला ग्रीन सिग्नल!

काय आहे प्रकरण...

महसूल यंत्रणेत विविध सुधारणा सुचविल्या. त्यात दीपक पांडे यांनी महसूल अधिकारी आरडीएक्स तर भूमाफीया डिटोनेटर असे संबोधले होते. हा उल्लेख महसूल यंत्रणेला चांगलाच जिव्हारी लागला. ही भाषा व वर्णन कोणत्याही शासकीय पत्रव्यवहाराचा भाग होऊच शकत नाही. त्यामुळे पांडेजी आम्हाला शहानपणा शिकवू नका. माफी मागा, असे संतापलेले कर्मचारी व अधिकारी म्हणतात. त्यांनी पांडे यांच्या कामकाजाविषयी अनेक तक्रारी केल्या होत्या.

पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी शासनाला दिलेले पत्र मागे घेत महसूल विभागातील अधिकाऱ्यांची बिनशर्त माफी मागावी, या मागणीसाठी विभागातील सर्व महसूलच्या अधिकारी, कर्मचारी यांनी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांची मंगळवारी भेट घेत श्री. पांडे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. जर १० एप्रिलपर्यंत पोलिस आयुक्तांवर कारवाई न झाल्यास ११ एप्रिलपासून विभागीय आयुक्त कार्यालय येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी अधिकारी संघटनेच्यावतीने देण्यात आला. या संदर्भात विभागीय आयुक्तांसह सचिवांना देखील निवेदन देण्यात आले.

पांडे संजय राऊतांच्या भेटीला

दरम्यान दीपक पांडे आज शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या भेटीला गेल्याचे सांगण्यात आले. त्याबाबत सोशल मिडीयावर पोस्ट फिरत होत्या.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com