Gram Panchayat Election Results : चाळीसगावातील ११ ग्रामपंचायतींमध्ये भाजपचं कमळ फुललं; आमदार मंगेश चव्हाणांनी मैदान मारलं

Gram Panchayat Election 2023 Chalisgaon Taluka Village Result : ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालात चाळीसगाव तालुक्यात भाजपचं कमळ फुललं आहे...
Gram Panchayat Election Results
Gram Panchayat Election ResultsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Gram Panchayat Election 2023 Result : जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींपैकी ११ ग्रामपंचायतींचे निकाल लागले आहेत. निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आपली ताकद दाखवली आहे. यात भाजपने तब्बल ११ ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व मिळविले आहे, तर एका ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचा विजय झाला आहे.

Gram Panchayat Election Results
Gram Panchayat Election : मतदान केंद्राबाहेर तरुणावर चाकू हल्ला; मध्यस्थीस गेलेला तरुणाचा भाऊदेखील जखमी

चाळीसगाव तालुक्यात बारा ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. त्यापैकी एक पातोंडा ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. ती ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आहे, तर ११ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका घेण्यात आल्या. त्यापैकी सर्व ग्रामपंचायतीचे निकाल लागले आहेत. त्यात भारतीय जनता पक्षाने दहा ग्रामपंचायतीत यश मिळविले आहे, तर एका ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला यश मिळाले आहे.

रामनगर, माळशेवगे, खेरडे, खेडगाव, वडाळावडाळी व न्हावेढोमणे,दहिवद, हिरापूर, सेवानगर, ओसर ग्रामपंचयातीवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला आहे. पिंप्री ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचा झेंडा फडकला आहे. खेडगाव ग्रामपंचायत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत साळुंखे यांचे वर्चस्व होते, परंतु या वेळी त्यांना झटका बसला आहे. या ठिकाणी त्यांचे वर्चस्व संपुष्टात आले असून, ही ग्रामपंचायत भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आली आहे. या ठिकाणी आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे अविनाश चव्हाण यांनी बाजी मारली आहे.

विजयी झालेले सरपंच...

खेडगाव- मरसाळे उषाबाई विनायक माळशेवगे- पाटील सुरेश युवराज

खेरडे- करिश्‍मा वाल्मीक निकम

रामनगर- दिनेश प्रकाश जाधव

न्हावे ढोमणे- वासुदेव वाल्मीक खैरनार

वडाळा वडाळी- अनिल युवराज पाटील

दहीवद- पंकज शिवाजी पवार

हिरापूर- विनोद आनंदराव पाटील

सेवानगर- जवाहरलाल प्रल्हाद चव्हाण

ओसर- प्रणाली राहुल पवार (सर्व भाजप),

पिंप्री बुद्रुक प्रचा- राजेंद्र नारायण मोरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट)

Gram Panchayat Election Results
Gram Panchayat Results : शहाजीबापूंनी गावची सत्ता राखली; पण तीन ग्रामपंचायतींवर शेकापचा झेंडा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com