Gram Panchayat Election : ग्रामपंचायतीच्या उमेदवारांना आता खर्च सादर करावा लागणार; अन्यथा...

Election Expenditure : हिशोबाचा आकडा जुळवण्यासाठी कागदपत्रांची उमेदवारांची धावपळ
Gram Panchayat
Gram Panchayat Sarkarnama

Ahmednagar Political News : ग्रामपंचायतीच्या निवडणुकींमधील उमेदवारांना अजून तरी विश्रांती नाही. निवडणुकीत उमेदवारांनी केलेला खर्च सादर करण्याच्या सूचना निवडणूक शाखेने केल्या आहेत. उमेदवारांनी हा खर्च 15 दिवसांत सादर केला नाही तर कारवाईची टांगती तलवार त्यांच्यावर असणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांनी खर्चाच्या हिशोबाची जुळवाजुळवीसाठी धांदल सुरू आहे.

नगर जिल्ह्यात 194 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. यातील 13 ग्रामपंचायती निवडणुका बिनविरोध झाल्या, तर 178 ग्रामपंचायतींच्या प्रत्यक्ष निवडणुका झाल्या. ही निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना 6 डिसेंबरपर्यंत निवडणुकीचा खर्च सादर करण्याचा आदेश नगर निवडणूक शाखेकडून देण्यात आला आहे. दरम्यान, तहसील कार्यालयाबाहेर असलेल्या खासगी लेखनिकांची मदत उमेदवार घेत आहे. झेरॉक्सवर झेरॉक्स मारून बिल तयार केली जात आहे. हिशोबाचा आकडा जुळवण्यासाठी कागदपत्रांची वारंवार तपासणी केली जात आहे.

Gram Panchayat
Baramati News : बारामतीत तणावाचं वातावरण; 'या' मुद्द्यावरून दोन संघटना आमने-सामने

नगर जिल्ह्यात एक हजार 701 जागांसाठी सात हजार 260 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मैदानात तीन हजार 995 रिंगणात राहिले. सरपंच पदाच्या जागेसाठी एक हजार 311 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील 610 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. निवडणूक होऊन निकाल लागला आहे. आता या उमेदवारांना निवडणुकीत केलेल्या खर्च सादर करण्याच्या सूचना नगर निवडणूक शाखेकडून करण्यात आला आहे.

अशी होणार शिक्षा..

विजयी आणि पराभूत उमेदवारांना हा निवडणूक खर्च सादर करावयाचा आहे. हा खर्च निवडणूक शाखेच्या सूचनांप्रमाणे सादर केला नाही तर उमेदवारांवर कारवाईचा अधिकार प्रशासनाला आहे. विजयी उमेदवारांचे सदस्यत्व, तर पराभूत उमेदवारांना पुढच्या निवडणुकीला अपात्रेची कारवाई प्रशासनाकडून केली जावू शकते. यामुळे निवडणुकीच्या रिंगणात असलेले सर्वच निवडणुकीच्या खर्चाच्या जुळणीसाठी कामाला लागले आहे. (Latest Political News)

Gram Panchayat
Deputy Sarpanch Election : गावगाड्यात पुन्हा रंगणार चुरस; आंबेगावात ३० ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांची निवडणूक जाहीर

खर्चाची मर्यादा..

सदस्य संख्या सात ते नऊ असलेल्या ग्रामपंचायतीच्या प्रत्येक सदस्याला 25 हजार, 11 ते 13, सदस्यांच्या ग्रामपंचायतीच्या सदस्याला 35 हजार आणि 15 ते 17 सदस्यांच्या ग्रामपंचायतीसाठी 50 हजार रुपये खर्चांची मर्यादा आहे.

सात ते नऊ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायत सरपंच पदासाठी 50 हजार, 11 ते 13 सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीसाठी एक लाख आणि 15 ते 17 सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीस 1 लाख 75 हजार रुपयांची खर्च मर्यादा आहे.

मर्यादापेक्षा खर्च मोठा...

निवडणुकीतील काही उमेदवारांनी यासाठी शॉर्टकट शोधला आहे. तहसील कार्यालयाबाहेर असलेल्या खासगी लेखनिकांची मदत घेत आहेत. त्यांच्याकडून निवडणुकीतील खर्चाचा तपशील तयार करून घेत आहेत. यासाठी लागणारी बिले झेरॉक्स मशीन आणि खासगी संगणक चालकांकडून तयार करून घेतली जात आहेत. याच बिलांच्या रंगीत झेरॉक्स मारून खर्च दाखवला जात आहे. या झेरॉक्स बिलांचा वापर वेगवेगळे उमेदवार करत आहेत. त्यामुळे निवडणूक शाखेत सादर होणाऱ्या या खर्चाच्या बिलांचे गांभीर्य निवडणूक शाखेचा किती? सादर होणाऱ्या बिलांची खरच तपासणी होते का? हा देखील मुद्दा येथे चर्चेत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Gram Panchayat
PCMC News : लाचखोरांना शेखरसिंहाचा मोठा दणका; यंदा सहा कर्मचारी सस्पेंड !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com