Pune News : आंबेगाव तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींच्या उपसरपंच निवडीचा कार्यक्रम बुधवारपासून (ता. २२ नोव्हेंबर) सुरू होत आहे. जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांच्या अध्यक्षतेखाली हे गावकारभारी निवडले जाणार आहेत. समसमान मते पडल्यास सरपंचांची भूमिका निर्णायक असणार आहे. त्यामुळे उपसरपंच निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष असणार आहे. (Election of Deputy Sarpanch of 30 gram panchayats in Ambegaon taluka from Wednesday)
पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील ३० ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच झाल्या आहेत. त्यात सरपंच हे थेट जनतेतून निवडले गेले आहेत. अनेक ग्रामपंचायतींमध्ये सरपंच एक गटाचा आणि बहुमत दुसऱ्या गटाकडे असे झालेले आहे. त्या ठिकाणी काम करताना सरपंचांचा कस लागणार आहे. ज्या ठिकाणी काट्यावर निवडून आलेल्या कुठल्या पॅनेलचा सत्ता आणायची हेही निर्णायक मतामुळे सरपंचांच्या हाती असणार आहे.
उपसरपंचांची निवड ही ता. २२ नोव्हेंबर, गुरुवार (ता.२३ नोव्हेंबर), शुक्रवार (ता. २४ नोव्हेंबर), गुरुवार (ता. ३० नोव्हेंबर) आणि ता. ६ डिसेंबर रोजी होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी निरीक्षक नोंदविण्यात येणार आहेत. उपसरपंच निवडीमुळे गावगावड्यात पुन्हा एकदा चुरस दिसून येणार आहे.
सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निरगुडसर ग्रामपंचायतीध्ये सरपंच हा शिंदे गटाचा झाला आहे, तर बहुमत हे वळसे पाटील गटाला आहे. तसेच, पारगाव ग्रामपंचायतीमध्ये सरपंच हा अपक्ष आहे. ज्या ठिकाणी सरपंच वेगळा गटाचा झाला आहे, त्या ठिकाणी चुरस दिसून येऊ शकते. मात्र, बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने सत्ता मिळविलेली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ग्रामपंचायतनिहाय उपसरपंचपदाची निवडणूक
ता. २२ नोव्हेंबर : चांडोली खुर्द ,अवसरी बुद्रुक, निरगुडसर, लोणी, पहाडदरा, कुशिरे बुद्रुक, कोलतावडे, कानसे, गोहे बुद्रुक, तळेकरवाडी.
ता. २३ नोव्हेंबर : वाळुंजनगर, टाव्हरेवाडी, जारकरवाडी, चास, पारगावतर्फे अवसरी बुद्रुक, ठाकरवाडी, पाटण, चपटेवाडी, सुपेधर, फुलवडे.
ता. २४ नोव्हेंबर : तांबडेमळा, जाधववाडी, महाळुंगे तर्फे घोडा, नांदूर, बोरघर, डिंभे बुद्रुक, टाकेवाडी, पिंपरगणे.
ता. ३० नोव्हेंबर : फलोदे
ता. ६ डिसेंबर : मांदळेवाडी
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.