Gram Panchayat Election: सरपंचांचे मत निर्णायक ! गावोगावी उपसरपंचपदाच्या निवडीत चुरस

Shrirampur : श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव आणि भोकर गावच्या उपसरपंचपदाची निवड चुरशीच्या लढतीने चर्चेत आली.
Gram Panchayat Election
Gram Panchayat ElectionSarkarnama

Ahmednagar News : नगर जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सरपंच आणि सदस्यांची मतदानाद्वारे निवड झाल्यानंतर आता उपसरपंचपदाच्या निवडणुका सुरू आहे. बहुतांश ठिकाणी बिनविरोध निवडीला प्राधान्य दिल्याचे दिसते. मात्र, श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव आणि भोकर गावच्या उपसरपंचपदाची निवड चुरशीच्या लढतीने चर्चेत आली. या ग्रामपंचायतीत उपसरपंचपदाच्या निवडणुकीत सरपंचांचे मत निर्णायक ठरले आहे.

उक्कलगाव सत्ताधारी गटामधून माजी सरपंच नितीन थोरात आणि शरद थोरात दोघांनी अर्ज दाखल केले होते. विरोधी गटातून वकील पुरूषोत्तम थोरात यांचे दोन, असे चार अर्ज दाखल झाले. दोन्ही गटाकडून एक-एक अर्ज माघारी घेण्यात आले.

उपसरपंचपदासाठी दोनच अर्ज शिल्लक राहिले. दोन्ही उमेदवारांना समसमान प्रत्येकी आठ-आठ मते मिळाली. त्यामुळे सरपंच रवीना शिंदे यांनी आपले निर्णायक मत दिले. सरपंच शिंदे यांच्या निर्णायक मतामुळे सत्ताधारी गटाचे नितीन थोरात यांची उपसरपंचपदी निवड झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Gram Panchayat Election
Shrirampur Politics: श्रीरामपूरमध्ये राजकारण तापलं; बाजार समितीतील सचिवपदाच्या वादाला राजकीय किनार

भोकर ग्रामपंचायतीत उक्कलगावची उसरपंचपदाच्या निवडीची पुनरावृत्ती झाली. येथे कानडे-ससाणे गटाच्या शीतल पटारे या सरपंच आहेत. त्यांचे सात सदस्य, तर मुरकुटे-ससाणे गटाचे आठ सदस्य आहेत. मुरकुटे-ससाणे गटाचे गिरीश मते आणि कानडे-ससाणे गटाचे सागर आहेर यांनी उपसरपंचपदासाठी अर्ज दाखल केले.

सरपंच शीतल पटारे यांनी आहेर यांना मतदान केल्याने दोघांनाही आठ-आठ समान मते मिळाली. समान मते पडल्यानंतर सरपंच यांना निर्णायक मत देण्याचा अधिकारानुसार त्यांनी सागर आहेर यांच्या पारड्यात मत टाकले. यानुसार सागर आहेर यांची उपसरपंचपदी निवड झाली.

सरपंचाचे मत निर्णायक

सरपंचांना राज्य सरकारने काही अधिकार दिले आहेत. पहिले दोन वर्ष त्यांच्यावर अविश्वास ठराव आणता येणार नाही. त्यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचाची निवडणूक होईल. उपसरपंच निवडणुकीत सरपंच हे सदस्य म्हणून मतदान करणार आहेत. उपसरपंच निवडणुकीत दोन उमेदवारांना समान मते पडल्यास एक निर्णायक मत देण्याचा अधिकारी सरपंचांना असणार आहे.

(Edited By - Ganesh Thombare)

Gram Panchayat Election
Jayakwadi Water Issue: मोठी बातमी! भंडारदरा धरणातून 'जायकवाडी'साठी पाणी सुटणार; जमावबंदीचे आदेश जारी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com