Shrirampur Politics: श्रीरामपूरमध्ये राजकारण तापलं; बाजार समितीतील सचिवपदाच्या वादाला राजकीय किनार

Shrirampur APMC : बाजार समितीच्या सचिवपदाचा वाद पुन्हा उफाळला
Shrirampur APMC
Shrirampur APMC Sarkarnama
Published on
Updated on

महेश माळवे :

Ahmednagar News: श्रीरामपूर येथील बाजार समितीतील सचिव पदाच्या खुर्चीला गावगुंडाच्या राजकारणाने पोखरल्याने हा वाद थेट पोलिस ठाण्यापर्यंत गेला. अंतर्गत कुरघोडी करताना ही संस्था शेतकर्‍यांची व शेतकर्‍यांसाठी असल्याचा गाव पुढार्‍यांना विसर पडल्याने कालच्या वादाने संस्थेची इभ्रत वेशीला टांगली गेली.

किशोर काळे हे श्रीरामपूर बाजार समितीत सन 2004 ते 12 नोव्हेंबर 2022 पर्यंत सचिव पदावर कार्यरत होते. सध्याचे संचालक मंडळ सत्तेवर येण्यापूर्वी याठिकाणी विखे गटाची सत्ता होती. नंतरच्या काळात न्यायालयाने संचालक मंडळाला मुदतवाढीस नकार दिल्याने प्रशासकाची नियुक्ती झाली.

दरम्यानच्या काळात ग्रामपंचायत व सेवा संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. बेलापूर येथील व बजार समितीचे प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी विखे गटाचे शरद नवले व अभिषेक खंडागळे यांच्यासह गावकरी मंडळाला साथ दिली.

Shrirampur APMC
Nagpur Winter Session 2023 : नागपूर अधिवेशनात राष्ट्रवादीचं कार्यालय कोणत्या गटाला मिळणार; विधिमंडळासमोर पेच...

बाजार समितीवर प्रशासक आल्यावर दत्तात्रय कचरे यांनी सचिव काळे यांच्या विरोधात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली. याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी चौकशीचा आदेश दिला. तत्कालीन प्रशासक दीपक नागरगोजे यांनी 12 नोव्हेंबर 2022 रोजी चौकशी पूर्ण होईपर्यंत सचिव पदाचा कार्यभार बाजार समितीचे ग्रेडर पदावर असलेले वाबळे यांच्याकडे देण्यास सांगितला.

विखे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राजकीय वजन वापरून काळे यांना पदावनत करून वाबळे यांना प्रभारी सचिवपदी नियुक्त केले. त्याला काळे यांनी आव्हान दिले. दरम्यानच्या काळामध्ये बाजार समितीची निवडणूक झाली. राजकीय घडामोडीत मुरकुटे-ससाणे गटाचे सुधीर नवले सभापती व विखे गटाचे बेलापूरचे अभिषेक खंडागळे उपसभापती झाले.

गावकरी मंडळाचे नेते शरद नवले, खंडागळे व सभापती सुधीर नवले गट गावपातळीवर एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. प्रभारी सचिव वाबळे यांनी बेलापूरच्या राजकारणात गावकरी मंडळाला साथ दिली. मात्र, सुधीर नवले सभापती झाल्यानंतर त्यांनी त्यांच्याशी जुळवून घेतले. यामुळे त्यांच्यावर विखे गटाची नाराजी असल्याची कुजबूज सुरू झाली. काळे यांच्यावरील आरोपांची सुनावणी जिल्हा निबंधक, सहायक संचालक, पणन मंत्री यांच्याकडे होऊन त्यांच्या बाजूने नुकताच निकाल लागला.

या विरोधातही उच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे. या सर्वांचा परिपाक मंगळवारी (ता.21) झालेल्या मारहाणीच्या घटनेत झाला. वाबळे यांच्यासह दहा ते बारा जणांनी आपल्यासह कैलास भणगे यांना कंबरेच्या बेल्ट, हॉकी स्टिकने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. गाडीच्या काचाही फोडल्या. तसेच गळ्यातील सोन्याची चैन व हातातील घड्याळ तोडून नुकसान केल्याची फिर्याद काळे यांनी पोलिसांत दिली आहे.

Shrirampur APMC
BJP Politics : " भाजपात असलो तरी सरकारविरोधात उपोषण करावे लागले,पण...", स्वपक्षीय नेत्याचा निशाणा

सचिवाच्या खुर्चीचे बाहुले

दरम्यान, समितीतील एकमेंकाचे विरोधक आपसातील जिरवा-जिरवीसाठी प्रयत्नशील आहे. याचा परिणाम सचिवाची खुर्ची बाहुले होवू लागले आहे. ज्या गटाने काळे यांना सचिव पदावरून पदावनत केले, तेच आता काळे यांना पदावर बसवण्यासाठी व ज्यांना पदावर बसवले त्यांना पदावनत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. सत्ताधारी गट वाबळे यांना पदोन्नती देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची जोरदार चर्चा सध्या तालुक्यात आहे.

(Edited By - Ganesh Thombare)

Shrirampur APMC
Ahmednagar Politics : विखे पिता-पुत्र निशाण्यावर; जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्याचा अजितदादांच्या आमदाराचा इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com