Nashik Gram Panchayat Results : नाशिकमध्ये ११ ग्रामपंचायतींवर अजित पवार गटाचा झेंडा!

Gram Panchayat Election results, Ajit Pawar group Wins in 11 Gram Panchayat-जिल्ह्यात ४५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत महायुतीने २२ वर महायुतीचा झेंडा फडकला.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar Group News : नाशिक जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात परंपरेप्रमाणे विद्यमान आमदारांच्या समर्थकांना कौल मिळाला आहे. त्यात २२ जागा जिंकून महायुती सर्वात पुढे आहे. (BJP alliance ahead & wins 22 Gram Panchayat in Nashik district)

ग्रामपंचायत निवडणुकीत नाशिक (Nashik) जिल्ह्यात भाजप, (BJP) अजित पवार (Ajit Pawar) आणि शिंदे गटाचा (Eknath Shinde) समावेष असलेल्या महायुतीने २२ गावांच्या निवडणुका जिकंल्या. महाविकास आघाडीला १५ ठिकाणी यश आले.

Ajit Pawar
Gram Panchayat Election Results : नेते जरी पक्ष सोडून गेले, तरी पालघरचा गड मात्र कार्यकर्त्यांनी राखला!

महायुतीच्या घटक पक्षांत भाजपला ५, एकनाथ शिंदे गटाला ६, उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला ११ अशा २२ ठिकाणी यश मिळाले. महाविकास आघाडीला १५ जागा मिळाल्या. यामध्ये शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट यांना प्रत्येकी पाच जागा मिळाल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन ग्रामपंचायतीच्या निवडणुका जिंकल्या.

आगामी निवडणुकांची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यात सत्ताधारी महायुतीचा बोलबाला जिल्ह्यातही दिसून आला. ४५ पैकी तब्बल २२ ग्रामपंचायतींवर महायुतीने वर्चस्व मिळविले. यातही अजित पवार गटाने सर्वाधिक ११ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले आहे. त्यापाठोपाठ १५ ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीने वर्चस्व मिळविले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन ग्रामपंचायती काबीज करत जिल्ह्यात खाते उघडले आहे. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्के बसले असून, परिवर्तन घडविले आहे. निवडणुकीत मतदारांनी तरुणाईला पसंती दिली असून, सर्वाधिक तरुण उमेदवार विजयी झाले आहेत.

जिल्ह्यात ४८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यात तीन गावांत बिनविरोध निवडणूक झाली. सोमवारी उर्वरित ४५ गावांच्या निवडणुकीचा निकाल लागला. १५ ग्रामपंचायतींमधील सरपंच आणि सदस्यांच्या रिक्त १८ जागांसाठी मतदान झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका नसल्याने स्थानिक नेतृत्वाची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली होती. ४८ ग्रामपंचायतींचे निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर मागील निवडणुकांच्या तुलनेत अनेक ग्रामपंचायतीत परिवर्तन झाले आहेत.

Ajit Pawar
Gram Panchayat Election 2023 Result : सांगलीत भाजपने गुलाल उधळला; पण पालकमंत्र्यांच्या पॅनेलचा धुव्वा

ग्रामपंचायत निवडणूक निकालात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने सर्वाधिक ११ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळविला आहे. त्याखालोखाल शिंदे गटाने सहा ग्रामपंचायतींमध्ये बाजी मारलेली दिसते. त्यानंतर भाजप, काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांनी समसमान प्रत्येकी पाच ग्रामपंचायतींमध्ये आपला झेंडा फडकावला आहे. मनसे पक्षाने दोन ग्रामपंचायतींमध्ये आपले वर्चस्व राखले आहे. अन्य आठ ग्रामपंचायतींमध्ये अपक्ष उमेदवारांचा दबदबा राहिला आहे. इगतपुरी तालुक्यातील बोरटेंभे ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने तेथील निवडणूक स्थगित करण्यात आलेली आहे.

Ajit Pawar
Kolhapur Gram Panchayat Results : कोल्हापुरात तब्बल २९ ग्रामपंचातींचे कारभारी बदलले; स्थानिक समीकरणांनी वर्चस्व राखले!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com