Kolhapur Gram Panchayat Results : कोल्हापुरात तब्बल २९ ग्रामपंचातींचे कारभारी बदलले; स्थानिक समीकरणांनी वर्चस्व राखले!

Kolhapur Gram Panchayat Results : स्थानिक आघाड्यांचीही जादू दिसली..
Kolhapur Gram Panchayat Results :
Kolhapur Gram Panchayat Results : Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Gram Panchayat Results 2023 : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकींचा धुरळा उडाला. कोल्हापूर जिल्ह्यातही ग्रामपंचायत निवडणुकींचा धुरळा उडाला. निकालात आपल्यालाच यश मिळाले, असा दावा सर्वच पक्षांकडून केला जाच आहे. मात्र, पक्षांसोबतच स्थानिक पातळीवर असलेल्या आघाडींनीही बाजी मारली आहे. ७४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकींच्या ४२ ठिकाणी सत्ताधाऱ्यांनीच आपली सत्ता राखली आहे. (Latest Marathi News)

Kolhapur Gram Panchayat Results :
Vikhe Patil on NCP : जनाधार गमावलेल्यांना काय महत्त्व देता, त्यांच्याकडं उरला नाही एकही नेता

तीन ग्रामपंचायतींच्या काही अंशी तर तब्बल २९ ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर होऊन कारभारी बदलले आहेत. यापूर्वी सामंजस्यपपणे निर्णय घेऊन बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींमध्येही स्थानिक राजकीय समीकरण घडून सत्ता आली. एकूण १५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. विजयी उमेदवारांनी कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे जल्लोष करत, गुलाल उडवत विजय साजरा केला.

Kolhapur Gram Panchayat Results :
Mangalwedha-Pandharpur Assemly : मंगळवेढ्यातील २७ ग्रामपंचायती ठरवणार आमदार; अवताडे, भालकेंसह इच्छुकांची धावपळ

कोल्हापूर जिल्ह्यात ७४ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका पार पडल्या. यापैकी ११ ग्रामपंचायतीत पोटनिवडणुका झाल्या. सार्वत्रिक निवडणुकीत ८५.०६ इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झाले, तर पोटनिवडणुकीसाठी ८१.३४ टक्के मतदान झाले, तर दोन्ही निवडणुकांची मतदानाचे प्रमाण ८४.७८ टक्के मतदान झाले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com