Gram Panchayat Election Results : नेते जरी पक्ष सोडून गेले, तरी पालघरचा गड मात्र कार्यकर्त्यांनी राखला!

Palghar Gram Panchayat Election : 'राज'पुत्रही येऊन गेले परंतु मनसेचा करिष्मा काही चालला नाही.
Palghar
PalgharSarkarnama
Published on
Updated on

Palghar News : राज्यात गेल्या सव्वा वर्षापासून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून गेले असले, तरी कार्यकर्ते मात्र मूळ पक्षासोबत राहिल्याने पक्ष सोडून गेलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट यांना काही ठिकाणी मतदारांनी नाकारल्याचे ग्रामपंचायतींच्या निकालावरून दिसून येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Palghar
Nilwande Dam : 'निळवंडे' वरून मुरकुटेंचा पुन्हा थोरात-विखेंवर निशाणा ; म्हणाले ''ज्यांनी तालुक्याचे पाणी घालवून...''

पालघर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाने 19 जागा, शिवसेना उद्धव ठाकरे 9 जागा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी 9 जागा, बहुजन विकास आघाडी 5 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट 4 जागा, स्थानिक आघाडी 3 जागा, महाविकास आघाडी - दोन जागा, मनसे एक, अपक्ष एक, एक बिनविरोध आणि एक बहिष्कार अशा एकूण 51 जागी झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील राजकीय पक्ष व आघाडीने विजय संपादित केला आहे,

जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पालघर तालुक्यातील 16 ग्रामपंचायती पैकी माहीम, शिरगाव, सरावली, सालवड, खैरा पाडा, मासवण, या ग्रामपंचायती 'उबाठा' गटाने जिंकल्या असून बोर्डी ग्रामपंचायत भाजपाकडून राष्ट्रवादीने घेतली आहे. त्यामुळे नेते जरी गेले असले तरी कार्यकर्त्यांनी पालघरचा गड राखला असे चित्र आहे.

Palghar
Gram Panchayat Election Results : श्रीगोंद्यात पाचपुते, जगताप, नाहाटांनी राखले गड!

या निवडणुकीत सीपीएम : 9 आणि बविआने 5 जागांवर विजय मिळवून आपले गड राखले आहेत. तर राज ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे येऊनही त्यांचा करिश्मा काही चालला नाही. त्याच बरोबर शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित यांचाही करिष्मा चालला नाही. दुसरीकडे मात्र भाजपाने पुन्हा एकदा पालघर मध्ये आपले पाय रोवण्यास सुरुवात केल्याचे निकालावरून दिसून येत आहे.

Palghar
Andheri Election : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीला वर्ष पूर्ण, आता मतदारराजा कोणाला देणार कौल?

एकूण ग्रामपंचायत -53

भाजप - 19

शिव सेना शिंदे गट - 04

शिवसेना उद्धव ठाकरे गट - 12

अजित पवार गट - 0

शरद पवार गट - 04

बहुजन विकास आघाडी: 5

सिपिएम : 9

मनसे: 1

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com