Gram Panchayat Results 2023 : महाविकास आघाडीने भाजप आमदार दिलीप बोरसेंची झोप उडवली!

Gram Panchayat Election Results : ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीने बागलाण मतदारसंघातील निवडणुकीत करून दाखवले.
MLA Dilip Borase & Ex MLA Sanjay Chavan
MLA Dilip Borase & Ex MLA Sanjay ChavanSarkarnama

Mahavikas Aghadi News : बागलाण मतदारसंघात भाजपचे आमदार दिलीप बोरसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यात रोजच राजकीय चढाओढ सुरू असते. त्यादृष्टीने ग्रामपंचायत निवडणूक महत्त्वाची होती. (NCP Sharad Pawar group as well Shivsena & Congress shown performance)

बागलाण मतदारसंघात (Nashik) महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) ग्रामपंचायत निवडणुकीत दणदणीत विजय संपादन केला आहे. त्याचा दावा भाजप (BJP) तसेच राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar) गटानेदेखील खोडून काढलेला नाही.

MLA Dilip Borase & Ex MLA Sanjay Chavan
Raj Thackeray News : राज ठाकरेंच्या शिलेदारांचा इगतपुरीत अनपेक्षित चौकार!

बागलाण मतदारसंघातील आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यातील एक ग्रामपंचायत बिनविरोध झाली. त्यामुळे सात ठिकाणी झालेल्या निवडणुकीपैकी सहा गावांचे सरपंच महाविकास आघाडीचे निवडून आले.

त्यामुळे महाविकास आघाडीने त्याचे जोरदार सेलिब्रेशन केले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या भावी राजकारणासाठी हा निकाल उत्साह वाढविणारा ठरणार आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार दिलीप मंगळू बोरसे आणि खासदार डॉ. सुभाष भामरे यांचा हा मतदारसंघ आहे. त्यामुळे विकासकामांच्या बातम्यांवर त्यांचा भर असतो. या भागाच्या सर्वाधिक वाकासाचा दावा त्यांनी सातत्याने केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, माजी आमदार संजय चव्हाण, दीपिका चव्हाण आणि भाजप यांच्यात अतिशय टोकाचे राजकारण सटाणा शहरात सुरू असते. त्यात रोजच आरोप-प्रत्यारोप होत असतात. त्यामुळे सातपैकी सहा सरपंच विजयी झाल्याच्या दाव्याने भाजपला ते मोठे आव्हान ठरू शकते.

बागलाण तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीने वर्चस्व मिळविले आहे. सहा ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे थेट सरपंच निवडून आले असून, महाविकास आघाडीच्या ४८ सदस्यांनी विजय मिळविला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. अनिल पाटील, शिवसेनेचे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे व तालुकाप्रमुख डॉ. प्रशांत सोनवणे यांनी दिली.

MLA Dilip Borase & Ex MLA Sanjay Chavan
Water Politics on Sinner : मतदारसंघातील पाण्यासाठी आमदार आशुतोष काळे झाले पाटकरी!

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली. तालुक्यातील भाक्षी, मुळाणे, केरसाणे, तताणी, जामोटी व केळझर या सहा ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे थेट सरपंच निवडून आले आहेत.

या सात ग्रामपंचायतींच्या विविध प्रभागांमधून महाविकास आघाडीचे सदस्य विजयी झाल्याने तीथे भाजपचा पराभव झाला आहे. आगामी राजकारणाची दिशा अशीच राहिल्यास भाजपची अडचण होऊ शकते.

MLA Dilip Borase & Ex MLA Sanjay Chavan
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा 'ॲक्टिव्ह मोड'वर; म्हणाले, माझी प्रकृती आता व्यवस्थित...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com