प्रदीप पेंढारे-
Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील सात गावातील ग्रामपंचायतींपैकी आमदार नीलेश लंके(Nilesh Lanke) (अजित पवार गट) गटाकडे सहा,तर एक ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फटकला.आमदार लंकेंच्या तालुक्यात मनसेने झेंडा फटकवल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
कान्हूर पठार,वाडेगव्हाण,मावळेवाडी,यादववाडी,काकडेवाडी,विरोली येथे राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून,जामगाव येथे मनसेच्या गटाने सत्ता स्थापन केली आहे.कान्हूर पठारच्या सरपंच पदासाठी संध्या किरण ठुबे आणि रेश्मा सागर व्यवहारे यांच्यात लढत झाली.(Latest MarathI News)
यात संध्या ठुबे या विजयी झाल्या. काकडेवाडीत अशोक पाराजी वाळुंज हे सरपंचपदावर विजयी झाले.विरोली गावात शोभा उत्तम गाडगे या सरपंचपदावर विजयी झाल्या.वाडेगव्हाण सरपंचपदी प्रियांका किशोर यादव विजयी झाल्या.(Gram Panchyat Results)
मनसेचे पारनेर तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी यांच्या पत्नी पुष्पा माळी जामगावच्या सरपंचपदावर बिनविरोध निवडून आल्या आहेत. यादववाडी सरपंचपदावर राजेंद्र बाळू शेळके विजयी झाले. मावळेवाडी सरपंच पदावर कल्याणी कांतीलाल भोसले विजयी झाल्या.
दरम्यान, कान्हुर पठार ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक दोनमध्ये मतमोजणी मशिनमधील मेमरी चीफमध्ये तांत्रिक अडचण आली होती. त्यामुळे निकालास तीन तास उशीर झाला. तहसीलदार गायत्री सौंदाणे यांनी आयोगाकडे याबाबत मार्गदर्शन मागितले.
यानंतरही प्रयत्न करूनही मशीनचा कार्यरत होत नव्हती. प्रयत्नानंतर तीन तासांनी मशीन सुरू झाली. यानंतर मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली. यात संध्या किरण ठुबे यांना 135 मतांनी विजयी घोषित करण्यात आले.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.