Gulabrao Patil : सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलं पोट्टं, त्याला जिल्हा परिषद शाळा काय कळते.. गुलाबराव पाटलांची रोहित पवारांवर टीका

Gulabrao Patil on Rohit Pawar : रोहित पवार हे इंग्लिश मीडियममध्ये शिकलेलं पोट्टं आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला पोट्टं आहे. त्याला जिल्हा परिषद शाळा काय कळते अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली.
Gulabrao Patilon, Rohit Pawar
Gulabrao Patilon, Rohit PawarSarkarnma
Published on
Updated on

Maharashtra politics : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी आम्ही ज्या पद्धतीने पक्षाचे लोक फोडतो, त्या पद्धतीने तुम्ही विद्यार्थी फोडा, असे विधान राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं होतं. त्यावर राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकार आता विद्यार्थ्यांना फोडण्यासाठी त्यांच्यामागे देखील ईडी, सीबीआय आणि आयटीच्या चौकशीचा ससेमिरा लावणार का, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर पवार-पाटलांमध्ये चांगलीच झुंपल्याचे पाहायला मिळत आहे.

गुलाबराव पाटील यांनी आता रोहित पवार यांना सणसणीत असं प्रत्युउत्तर दिलं आहे. ते म्हणाले, रोहित पवार हे इंग्लिश मीडियममध्ये शिकलेलं पोट्टं आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला पोट्ट्यां आहे. त्याला जिल्हा परिषद शाळा काय कळते. अशा पद्धतीने एकेरी भाषेत त्यांनी रोहित पवारांचा समाचार घेतला.

Gulabrao Patilon, Rohit Pawar
Nashik & Raigad Guardian Minister : रायगडमुळे नाशिकचही घोडं अडलं, पालकमंत्रीपदाबाबत मोठी अपडेट समोर

जळगाव येथे सोमवारी (दि.१४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जळगाव येथे आयोजित कार्यक्रमात पत्रकारांशी गुलाबराव पाटील यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी रोहित पवार यांनी केलेला टीकेला प्रत्युत्तर दिले. रोहित पवार अपूर्ण बुद्धीचा माणूस असून त्याने आधी भाषण नीट तपासून घ्यावं. ते सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलं पोट्ट आहे, इंग्लिश मीडियममध्ये शिकलं आहे, त्याला जिल्हापरिषद शाळा काय कळते? असे एकेरी भाषेतच त्यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली.

गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले होते?

12 एप्रिल रोजी एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले होते की, जिल्हा परिषदेतील विद्यार्थीसंख्या कमी आहे असं सांगताना जिल्हा परिषदेच्या शाळांत विद्यार्थीसंख्या वाढली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र ही अपेक्षा व्यक्त करताना आम्ही ज्या पद्धतीने पक्षातील लोक फोडतो, त्या पद्धतीने तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजे, असा सल्ला गुलाबराव पाटील यांनी शिक्षकांना दिला. त्यांच्या याच विधानावर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या

Gulabrao Patilon, Rohit Pawar
Balasaheb Thackeray Speech : उबाठा सेनेचे नाशिकमध्ये शिबीर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे कधीही न ऐकलेले भाषण ऐकवणार

रोहित पवारांनी काय पोस्ट केली होती?

आता विद्यार्थी फुटले नाही तर त्यांच्यामागेही मंत्री महोदय #ED #CBI #IT च्या चौकशीचा ससेमिरा लावतात की काय, याची भीती वाटतेय.. मंत्री महोदय, विद्यार्थी फोडाफोडीपेक्षा सरकारी शाळांमध्ये पुरेशा सुविधा आणि शिक्षकांच्या माध्यमातून शाळांची गुणवत्ता सुधारा. शाळांसमोर विद्यार्थ्यांच्या रांगा लागतील..असे ट्विट रोहित पवारांनी केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com