Gulabrao Patil : जळगाव पोलिसांची घोडचूक, गिरीश महाजनांचे जलसंपदा खाते गुलाबरावांना देऊन टाकले..

Jalgaon police mistakenly recorded Girish Mahajan’s ministry under Gulabrao Patil’s name : जळगाव पोलीस दलातील कार्यक्रमात डिजिटल स्क्रीन बोर्डवर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या खात्याचा चुकीचा उल्लेख करण्यात आला. त्याची चांगलीच चर्चा रंगली होती.

Gulabrao Patil, Girish Mahajan
Gulabrao Patil, Girish Mahajan Sarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : शासकीय कार्यक्रमात प्रोटोकॉलचे पालन करणे अत्यंत महत्वाचे असते. प्रोटोकॉल काळजीपूर्वक पाळला गेला पाहिजे, त्यावर वरिष्ठ अधिकारी सातत्याने लक्ष ठेऊन असतात. कारण अशा प्रसंगी काही चूक झाली तर त्याची मोठी चर्चा होत असते. त्यावरुन टीकाही होण्याची शक्यता असते. शासकीय कार्यक्रमात जळगाव पोलिसांकडून अशीच एक घोडचूक झाली आहे.

जळगाव पोलीस दलातील कार्यक्रमात डिजिटल स्क्रीन बोर्डवर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या खात्याचा चुकीचा उल्लेख करण्यात आला. गुलाबराव पाटील हे पाणीपुरवठा विभागाचे मंत्री आहे. पण पोलिस दलाच्या कार्यक्रमात पाटील यांच्या नावासमोर जलसंपदामंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला. त्याची चांगलीच चर्चा रंगली होती.

जळगाव जिल्हा पोलीस दलाचा 'स्मार्ट इ बीट' सॉफ्टवेअर प्रणालीचा उद्घाटन कार्यक्रम होता. या नवीन सॉप्टवेअरच्या उद्घाटनासाठी मंत्री गुलाबराव पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. यावेळी कार्यक्रमातील डिजीटल स्क्रिनवर गुलाबरावांच्या नावापुढे जलसंपदा मंत्री असा उल्लेख होता. मात्र जलसंपदा खाते हे गिरीश महाजन यांच्याकडे आहे. दोघेही जळगाव जिल्ह्यातील असतानाही पोलिसांना कोणाकडे कोणते खाते आहे याचा विसर पडला, अशीच चर्चा यावेळी झाली.


Gulabrao Patil, Girish Mahajan
Sharad Pawar : 'तारीख ठरली, वेळ ठरली ! सोबत लढणार की स्वबळावर? शरद पवार काय ते स्पष्ट करणार

दरम्यान यासंदर्भात स्वत:गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, पाणीपुरवठा व जलसंपदा हे दोन्ही खाते पाण्याशी संबधित आहे. त्यामुळे ही चूक झाली असेल. मला त्याचे काहीही वाईट वाटलेले नाही. असे गुलाबराव पाटील म्हणाले.

काय आहे स्मार्ट ई-बीट सिस्टीम

ज्या स्मार्ट ई बीट सिस्टीम च्या उद्घाटनासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला ते, स्मार्ट ई-बीट सिस्टीम ही एक अत्याधुनिक, पूर्णपणे डिजिटल आणि रिअल-टाइम पेट्रोलिंग प्लॅटफॉर्म आहे. यामुळे पोलीस पेट्रोलिंग अधिक चांगली, पारदर्शक आणि कार्यक्षम होते. त्यासाठी हे सॉफ्टवेअर डिझाइन केले आहे. ही प्रणाली खरोखर पोलिस दलासाठी एक क्रांतिकारी पाऊल ठरु शकते. मोबाईल आणि वेब अॅपलिकेशनच्या माध्यमातून पोलिस कर्मचाऱ्यांचे गस्त नियंत्रण अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम बनवण्यासाठी या प्रणालीची निर्मिती झाली आहे. भारतात काही ठराविक भागांमध्ये ही प्रणाली या आधीच वापरली जात आहे. आता ती जळगाव जिल्ह्यात वापरली जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com