Bhima River Water News : भीमा नदीपात्रात पाणी आले, दोन्ही पवार गटाकडील पदाधिकारी श्रेयवादात जुंपले...

Shrigonda Bhima River Water : श्रीगोंदा भीमा नदीपात्रात आलेल्या पाण्यावरून शरद पवार गट आणि अजित पवार गटात श्रेयवाद पेटला आहे. राजेंद्र नागवडे आणि हरिदास शिर्के यांच्याकडून भीमा नदीपात्रात पाणी कसे आले, यावर एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
Rajendra Nagwade and Haridas Shirke
Rajendra Nagwade and Haridas Shirkesarkarnama

Shrigonda News : श्रीगोंदा भीमा नदीपात्रात आलेल्या पाण्यावरून शरद पवार गट आणि अजित पवार गटात (Sharad Pawar group V/S Ajit Pawar group) श्रेयवाद पेटला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे पाणी आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केला तर, खोटे नाटे सांगत शेतकऱ्यांची दिशाभूल करून जलपूजन केल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के यांनी लगावला. पाणीवाद आणखी पेटणार असल्याचे सांगितले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी पत्रक काढून भीमा नदीपात्रात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळेच पाणी आल्याचे म्हटले. पुरंदर पाणी उपसा सिंचन योजना बंद आहे. यामुळे श्रीगोंदा, कर्जत, दौंड आणि शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची समक्ष भेट घेऊन ऊस आणि चारा पिकांना पाण्याची आवश्यकता असल्याकडे लक्ष वेधले होते. शेतकऱ्यांच्या या मागणीकडे अजित पवार यांनी लक्ष घातले आणि पाणी सोडण्यात आले. भीमा नदीपात्रात आलेल्या पाण्याचे श्रेय श्रीगोंदा तालुक्यातील कार्यकर्ते आणि नेते चुकीच्या पद्धतीने घेत असून, आपला मोठेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. असा श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांनी करू नये, असाही इशारा नागवडे यांनी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rajendra Nagwade and Haridas Shirke
Nagar Urban Bank Fraud : 'त्या' भाजप नेत्यांवर कारवाईची धमक फडणवीस दाखवणार का?

दरम्यान, अजित पवार गटाच्या राजेंद्र नागवडे यांच्या श्रेयवादावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के यांनी चांगलीच टोलेबाजी केली आहे. गेल्या महिन्यात पाण्यावाचून शेतकऱ्यांची पिके जळून गेली. त्यावेळी कुकाडीचे पाणी सोडले नाही. भीमा नदीवरील (Bhima River Water) बंधाऱ्यांच्या फळ्या काढून पाणी आणल्याचे खोटे-नाटे सांगत शेतकऱ्यांची दिशाभूल करून जलपूजन केले गेल्याची टिका हरिदास शिर्के यांनी केली. तसेच श्रीगोंदा पंचायत समितीचे माजी उपसभापती गणेश झिटे यांनी दोन दिवसापूर्वी दौंडचे आमदार राहुल कुल आणि श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांच्या पाठपुराव्याने पाणी आल्याचे सांगत जलपूजन केले. यावर देखील हरिदास शिर्के यांनी टिका केली.Political credulity was colored by the inflow of water into the Bhima river basin in Shrigonda

हरिदास शिर्के यांनी जलसंपदा विभागाच्या (Department of Water Resources) नियमाप्रमाणे दरवर्षी भीमा नदीवरील बंधाऱ्यांच्या फळ्या 25 मे रोजीच्या दरम्यान काढल्या जात असल्याचे सांगितले. गेल्या महिन्यात कुकडीला आलेले पाणी भाजपचे सरकार असताना, तुमची ताकद असताना देखील श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्याला अपेक्षित पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांचे (farmer) मोठे नुकसान झाले. श्रीगोंद्यातील लेंडी नाल्यात देखील पाणी आणता आले नाही. तुमचे सरकार असताना त्यांना रस्त्यावर बसून देखील पाणी आणता आले नाही. भीमा नदी पात्रात आलेल्या पाणी आणल्याबद्दल खोटे-नाटे सांगत शेतकऱ्यांची दिशाभूल करून नौटंकी करत पाणी पूजन करत श्रेयवाद घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला, अशीही टिका हरिदास शिर्के यांनी केली.

Rajendra Nagwade and Haridas Shirke
Anandrao Adsul News : फक्त नाटकबाजी, नवनीत राणा पराभूत होणार; शिंदे गटाच्या नेत्याचा दावा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com