Anandrao Adsul News : फक्त नाटकबाजी, नवनीत राणा पराभूत होणार; शिंदे गटाच्या नेत्याचा दावा

Amravati Lok Sabha : मागच्या निवडणुकीत मी हरलो नाही. हरवलो गेलो. मी कोणाचे नाव घेणार नाही. मात्र, वेळ आली तर नाव देखील घेणार, असा सज्जड इशारा देखील आनंदराव अडसूळ यांनी दिले.
Navneet Rana
Navneet Ranasarkarnama

Lok Sabha Election 2024 : भाजपचे महायुतीमधील साथीदार असलेल्या शिंदे गटाच्या नेत्यांनी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा पराभूत होणार असल्याची भविष्यवाणी केली. पाच वर्षांत काहीच काम केलं नाही त्यामुळे पराभूत होणारच, असे देखील या नेत्याने ठणकावले. नवनीत राणांनी 2019 च्या निवडणुकीत पराभूत केलेल्या आनंदराव अडसूळ यांनी ही भविष्यवाणी केली आहे. विशेष म्हणजे आनंदराव अडसूळ शिवसेनेत Shivsena (शिंदे गट) असल्याने त्यांच्या वक्तव्याला वेगळेच महत्त्व आले आहे.

मागच्या निवडणुकीत मी हरलो नाही. हरवलो गेलो. मी कोणाचे नाव घेणार नाही. मात्र, वेळ आली तर नाव देखील घेणार, असा सज्जड इशारा देखील आनंदराव अडसूळ Anandrao Adsul यांनी दिला. फक्त नाटकबाजी, नाटक करतात. कोणा महिलेच्या घरी जावून पोळ्या लाटतात. स्वतःच्या घरी कधी पोळी लाटली का? आदिवासी महिलांमध्ये जावून फेर धरायचा, दहीहंडीचा कार्यक्रम करायचा, एखाद्या अभिनेत्याला आणयचं. फक्त नाटक, लोकांना आवडलं नाही, अशी बोचरी टीका अडसूळ यांनी नवनीत राणांवर Navneet Rana केली.

Navneet Rana
Udayanraje Bhosale News : उदयनराजेंनी घेतली राज्यपालांची भेट, साताऱ्याच्या विकासाचे घातले साकडे

नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आनंदराव अडसूळ यांच्यासह महायुतीचे घटक असलेले बच्चू कडू यांनी विरोध केला होता. राणा यांनी आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव अभिजित अडसूळ यांची भेट घेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. तर, बच्चू कडू यांनी राणा यांना विरोध कायम ठेवत त्यांच्या विरोधात आपल्या प्रहार संघटनेकडून उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अडसुळांची मदत कोणाला?

महायुतीचा घटक म्हणून निवडणूक काळात आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांनी उघडपणे कोणतेही वक्तव्य केले नाही. मात्र, निकालाला काही दिवस बाकी असताना आनंदराव अडसूळ यांनी उघडपणे नवनीत राणा पराभूत होणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे निवडणूक काळात अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात काम केल्याच्या चर्चा आहेत

Navneet Rana
Kerala Lok Sabha 2024: डावे डोके वर काढू देईना, 'कमळ' फुलेना, 'हात' हलेना!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com