Nagar Urban Bank : नगर अर्बन बँकेतील घोटाळ्याला (Nagar Urban Bank scam) भाजप नेते कारणीभूत आहेत. ते उजळ माथ्याने फिरत आहेत. यांच्यावर कारवाई करण्याची धमक भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखवणार का? असा सवाल ठेवीदारांच्यावतीने सभासद राजेंद्र चोपडा यांनी केला आहे. राजेंद्र चोपडा यांनी याबाबतचे पत्र देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना राजेंद्र चोपडा यांनी पत्र लिहिले आहे. यात त्यांनी बँकेचा स्थापनेपासूनचा ते बँक भाजप (BJP) नेत्यांनी कशी बुडवली, याचा इतिहास मांडला आहे. भाजपचे दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी यांनी बँकेच्या माध्यमातून २०१४ पासून कसे बेकायदेशीर कर्ज वाटप केले, याची माहिती मांडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री, राज्य गृहमंत्री, मुख्य सचिव, पोलिस महासंचालक यांच्याकडे तक्रारी केल्या. पण त्यावर कारवाई झाली नाही. परिणाम बँक घोटाळेबाजांमुळे बुडाली, असे राजेंद्र चोपडा यांनी पत्रात म्हटले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या बँकेतील घोटाळ्याचे मुख्य आरोपी भाजपचे दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी (Dilip Gandhi) असून, त्यांच्या या घोटाळेबाज कृत्यात त्यांची मुले देखील सहभागी आहेत. फॉरेन्सिक ऑडिटमध्ये तसे निष्पन्न झाले आहे. दिलीप गांधी खासदार असताना पदाचा वापर करत नगर शहरातील मर्चंट बँकेला देखील फसवले. त्याचप्रमाणे जळगांव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी या पतसंस्थेचे देखील मोठे कर्ज बुडवले. दिलीप गांधी यांच्या पत्नी सरोज या संस्थापक अध्यक्ष असलेल्या राजमाता महिला नागरी सहकारी पतसंस्था देखील मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळा करून अवसायनात काढली. गांधी परिवाराचा नगरमध्ये (Nagar) मोठा आर्थिक गैरव्यवहार आहेत. परंतु भाजपचे (BJP) असल्या कारणानेच त्यांच्यावर कारवाई होत नाही, असा देखील आरोप राजेंद्र चोपडा यांनी केला. Nagar Urban Bank scam case
नगर अर्बन बँकेला स्थापन होऊन 113 वर्षे झाली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) अर्बन बँकेचा परवाना बँकेचे 4 ऑक्टोबर 2023 रद्द केला. बँकेकडे जवळपास 820 कोटी रूपयांची 4 ऑक्टोबर 2023 पर्यंत थकबाकी आहे. संस्थेच्या ठेवीदारांना 06 डिसेंबर 2021 पासून ठेवी परत मिळत नाहीत. हजारो ठेवीदारांचे 350 कोटी रूपये बँकेत अडकलेले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या कारवाईमुळे नगर अर्बन बँकेवरील अनेक गोरगरीब लोकांच्या ठेवी अडकलेल्या आहेत.
एसआयटी (SIT) मार्फत तपास सुरू असला तरी तो संथ गतीने सुरू आहे. घोटाळेबाज समाजात उजळ माथ्याने फिरत आहेत आणि कायद्यालाच आव्हान देत आहे. पुण्यात एका मोठ्या बिल्डरच्या मुलाने नशेत अपघात करून दोन निष्पाप तरूणांचा बळी घेतला. यात जनभावना तीव्र असल्याने पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून आरोपीची धरपकड केली. याच पद्धतीने अर्बन बँकेच्या गोरगरिब ठेवीदारांच्या भावना आहेत. तरी सरकारने या विषयावर गंभीरता दाखवून आरोपींवर कायदेशीर कारवाई करावी आणि ठेवीदारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जागृत सभासद राजेंद्र चोपडा यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.