Pradnya Satav News : प्रज्ञा सातव यांचा मोठा गौप्यस्फोट : नोव्हेंबरमध्येही माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न; पण मी सिरियसली घेतले नव्हते...

त्यानंतर बुधवारी दुसऱ्यांदा कळमनुरी तालुक्यातील कसबा धावंडा या गावी माझ्यावर हल्ला झाला.
Pradnya Satav
Pradnya Satav Sarkarnama

Mumbai News: मागील नोव्हेंबरमध्ये आम्ही भारत जोडो (Barath Jodo Yatra) यात्रेची तयारी करत होतो, त्यावेळी पेडगावमध्ये एके दिवशी दुपारी चारच्या सुमारास माझ्यावर पहिल्यांदा हल्ला (Attack) करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, त्यावेळी मी काही जास्त गांभीर्याने घेतले नव्हते. त्यानंतर बुधवारी दुसऱ्यांदा कळमनुरी (Kalmanuri) तालुक्यातील कसबा धावंडा या गावी माझ्यावर हल्ला झाला. त्यामुळे आता शांत बसून चालणार नाही, या भूमिकेतून मी पोलिसांत तक्रार दिली आहे, असे काँग्रेस (Congress) आमदार प्रज्ञा राजीव सातव (Pradnya Satav) यांनी सांगितले. (Attempted attack on me last November as well; But I didn't take it seriously: Pradnya Satav)

Pradnya Satav
Pradnya Satav News: महिला आमदाराच्या गालात चापट मारणारा पोलिसांच्या ताब्यात

आमदार सातव म्हणाल्या की, आम्ही आमच्या पक्षाचे काम ताकदीने करत आहोत. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. त्यामुळे आमच्या दौऱ्यावेळी संपूर्ण गावकरी जमा होतात. त्यामुळे आमची ताकद वाढताना दिसून येत आहे. आम्हाला जनतेचा मिळणार प्रतिसाद पाहून आमचे दौरे कुठेतरी थांबविले पाहिजे. तसेच महिला आहे, तिला घाबरवून घरी बसवलं पाहिजे, अशा पद्धतीने काही लोक काम करत असतील, हे नाकारता येत नाही. कारण हल्ला करणाऱ्या व्यक्तीशी माझं कोणतंही वैमनस्य नव्हतं. मी त्याला ओळखतही नव्हते, त्यामुळे त्याने हा हल्ला माझ्यावर का करावा, हे संशयास्पद आहे.

Pradnya Satav
Cash For Ministership : मंत्रिपदासाठी १०० कोटींची मागणी : भाजप आमदारांबरोबरच कॅबिनेट मंत्र्यालाही फसविण्याचा प्रयत्न

पोलिस तपासाबाबत आताच समाधान व्यक्त करता येणार नाही. कारण, पकडण्यात आलेला व्यक्ती या प्रकरणामागे कोण आहे, हे सांगत नाही. तो सांगतो आहे की मी स्वतः हे केलेले नाही. मला हे करायला सांगितले आहे. इथपर्यंत त्याच्याकडून माहिती मिळालेली आहे. पण त्याला हे कोणी करायला सांगितले, त्याचं नाव सांगण्यास तो घाबरत आहे. या हल्लामागील सूत्रधाराचे नाव समोर येत नाही; तोपर्यंत आम्ही समाधान व्यक्त करू शकत नाही. या हल्ल्यामागे कुठची तरी मोठी ताकद असू शकते. कारण, आमदारावर आणि तेही महिला आमदारावर हल्ला करणं, यामध्ये कोणीतरी मोठी व्यक्ती पाठीशी असल्याशिवाय एवढं मोठं धाडस कोणी करणार नाही, असेही सूतोवाचही सातव यांनी केले आहे.

Pradnya Satav
Sudhir Mungantiwar At Baramati : अब्दुल सत्तारांनी मंत्रिमंडळ बैठकीतच सांगितले अन तातडीने बारामती दौरा ठरविला : मुनगंटीवारांची स्पष्टोक्ती

माझ्यावर कोणी हल्ला केला हे, पोलिस तपासात लवकरच पुढे येईल. सतर्क राहून मी माझ्या पक्षाचे काम यापुढेही चालूच राहील. राहुल गांधी आणि राजीव सातव यांची जी शिकवण होती, त्यानुसार गावोगावी जनतेमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कार्यरत आहे. घाबरून घरात बसणारी मी नाही. मीच नाही तर माझ्यासोबत ५-५० महिला येतील आणि संपूर्ण ताकदीने आम्ही आमचे कार्यक्रम आणि जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करत राहणार आहे, असे आमदार प्रज्ञा सातव यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com