Eknath Khadse on Hindutva: 2014 नंतर हिंदुत्वाची व्याख्या बदलली का?

BJP Politics: जे भाजपला सोडून गेले ते पुन्हा भाजपमध्ये आले नाहीत.
Eknath Khadse on Hindutva:
Eknath Khadse on Hindutva:Sarkarnama
Published on
Updated on

Eknath Khadse on Hindutva: असे खोके बिके महाराष्ट्राने हे अनुभवलं नाही, 2014 नंतर राजकारणाची दिशा बदलली, असं गुंडगिरीचं, दहशतीचं वातावरण, केसेस दाखल करण, राज्यात हे जे काही सुरु आहे ते जनतेला आवडणार नाही. आता निर्णय जनतेच्या हातात आहेत. अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मांडली. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतील त्यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे. (Has the definition of Hindutva changed after 2014)

खडसे म्हणाले की, आम्ही हिंदूत्त्वासाठी गद्दारी केली असं, गुलाबराव पाटील म्हणत आहेत. पक्ष बदलणं आणि खोके बदलंण हे तंत्र आहे. मी पक्ष बदलला तेव्हा मी आमदार नव्हतो, किंवा कोणत्याही पदावर नव्हतो. तेव्हा भाजपचा राजीनामा दिला होता. हे लोक तर आमदार, मंत्री होते. जे शिंदेंसोबत गेले तिथून खोका संस्कृती आली आणि ती महाराष्ट्रात प्रचलित झाली. गुलाबराव पाटील यांच्यासाठी जे सोयीच आहे ते ते म्हणत राहतील. मला सोयीचं असेल ते मी सांगेल. पण जनतेचा कल काय आहे. जे सर्वे होत आहेत त्यात काय म्हटलं आहे. त्यातील बहुसंख्य सर्वेमध्ये असं आढळून आलंय की आता महाराष्ट्रात भाजपचं (BJP) सरकार येणार नाही.

Eknath Khadse on Hindutva:
Sharad Pawar Appreciated Nitin Gadkari : मोदी सरकारमधील कोणता मंत्री तुम्हाला आवडतो ? ; शरद पवारांनी घेतलं 'हे' नाव..

खडसे म्हणाले, ''भाजपमध्ये ज्यांच्यावर मोठे-मोठे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते पक्षात येऊन स्वच्छ झाले. अडचणीच्या काळात शरद पवार यांनी मला विधानपरिषद सदस्य बनवून राजकीय विजनवासातून बाहेर काढले. त्यामुळे आता भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही.’ अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. जे भाजपला सोडून गेले ते पुन्हा भाजपमध्ये आले नाहीत. एकतर त्यांच निधन झालं किंवा बरेच जण घरीच आहेत. पण नव्याने भाजपमध्ये कोणीही आलेलं नाही. वर्षानुवर्षे जे भाजपमध्ये आहेत, ज्येष्ठ आहेत, त्यांना भाजपमध्ये अपमानास्पद वागणूक दिली जाते, आम्ही २०१४ ला आणि २०१९ मध्ये सर्वांची मोठी मेहनत होती. त्यावेळी सरकार विरोधी वातावरण निर्माण झालं होतं. भाजपचचं सरकार येणार असल्याची वातावरण निर्मिती झाली होती. त्याच काळात अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. (Maharashtra Politics)

मी पक्षात आलो आणि लगेच मुख्यमंत्रीपदाचा दावेदार झालो असं नाही. आज जे मंत्रिमंडळात आहेत त्यांचं भाजपसाठीचं योगदान शुन्य आहे. ज्यांनी आमच्यावर आरोप केले. देवेंद्रजींवर आरोप केले तेच आज मंत्रिमंडळात आहेत. ज्या काळात रात्रंदिवस कष्ट केले, ४० वर्षे दिवसरात्र पक्षाचं काम केलं. सरकारला सळो की पळो करुन सोडलं. त्या कालखंडात दावेदार असणं हा माझा गुन्हा होता का, असा सवालही खडसेंनी उपस्थित केला.

पक्षाने मला काहीच दिलं नाही, असं नाही. पण काही विशिष्ट लोकांमुळे माझ्यावर पक्ष सोडण्याची वेळ आली. मुलं बाळं सोडून आम्ही १५-१५ दिवस तुरुंगात काढले. आमचं संपुर्ण आयुष्य गेलं. पक्षाने आम्हाला काय दिलं हे जितकं महत्त्वाच आहे, तितकचं पक्षासाठी आम्ही जे काही केलं ते महत्त्वाचं नाही का, असा सवालही त्यांनी भाजपला केला. (NCP)

Eknath Khadse on Hindutva:
MlA Bhondekar News : भंडारा जिल्ह्याला हवाय घरचा पालकमंत्री, आमदार भोंडेकरांचा शिंदे-फडणवीसांना इशारा !

भाजपवर मी कधीच टिका केली नाही. पण काही विशिष्ट लोकामुळे मला पक्ष सोडावा लागला.भाजपच्या कोणत्याही नेत्यांवर मी टिका केली नाही. पण काही एक-दोन नेते आजही मला छळत आहेत. असे नतद्रष्ट लोक आहेत त्यांच्यावर माझा रोष आहेत. मी इतका कृतघ्न नाही की, पक्षाने मला खुप काही दिलं नाही असे म्हणेल. पण माझही उभं आयुष्य मी पक्षाला दिलं आहे, असही त्यांनी यावेळी नमुद केलं.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com