Dhangar Reservation Protest : सरकारसमोरचं संकट वाढलं; यशवंत सेनेच्या उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली,मंत्री महाजन चौंडीला जाणार

Girish Mahajan Chaundi Visit : गेल्या वीस दिवसांपासून उपोषण करत असल्याने उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली आहे.
Dhangar Reservation Protest
Dhangar Reservation Protest Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar : मराठा आरक्षणासह राज्यात धनगर आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा या मागणीसाठी राज्यभर समाजाच्या वतीने वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करून राज्य सरकारवर दबाव आणला जात आहे. याचाच एक भाग म्हणून नगर जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मस्थळी चौंडी येथे गेल्या वीस दिवसांपासून यशवंत सेनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येत आहे.

गेल्या वीस दिवसांपासून उपोषण करत असल्याने उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली आहे. यामुळे समाजामध्ये एकीकडे असंतोष असतानाच राज्य सरकारवरही आता दबाव वाढत चालला आहे. या परिस्थितीत सोमवारी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन(Girish Mahajan) हे चौंडी येथे येत असल्याची माहिती आहे.

Dhangar Reservation Protest
Eknath Khadse Vs Girish Mahajan: भाजपमध्ये येण्यासाठी हातपाय जोडू नका; शरद पवारांना घट्ट पकडून राहा, महाजनांचा खडसेंना टोला

चौंडी येथे गेल्या वीस दिवसांपासून यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाचे कार्यकर्ते आमरण उपोषण आंदोलन करत आहेत. यामध्ये अण्णासाहेब रुपनवर आणि सुरेश बंडगर हे गेल्या सलग वीस दिवसांपासून उपोषणावर असल्याने त्यांची तब्येत खालवली आहे. त्यांनी सुरू असलेले शासकीय उपचारही गेल्या दोन दिवसांपासून नाकारले असून पाणी त्याग केलेला आहे. त्यामुळे एकंदरीतच त्यांची तब्येत अजून जास्त खालवल्याचं समोर येत आहे.

मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीमध्ये सरकारसोबत धनगर समाजाच्या नेत्यांची बैठक पार पडली. मात्र, धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने समाजामध्ये सरकार बद्दल नाराजीची तीव्र भावना वाढत चालली आहे. रविवारी यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून उपोषणकर्त्यांच्या तब्येतीची माहिती घेतली. त्याचबरोबर सोमवारी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे चर्चा करण्यासाठी चौंडी येथे येत असल्यास दोडतले यांना सांगण्यात आलं आहे.

याबाबत दोडतले म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या वतीने सोमवारी गिरीश महाजन धनगर समाजाच्या आरक्षण मुद्द्यावर चर्चेसाठी चौंडीत येत आहेत. मात्र, त्यांच्यासोबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे आहेत का याबाबत माहिती नसल्याचं दोडतले यांनी सांगितले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार महसूलमंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrishna Vikhe Patil) हे मुंबईमध्ये आहेत. मात्र, त्यांचा नगर जिल्ह्याचा शासकीय दौरा अद्यापपर्यंत आला नसल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, सोमवारी चौंडी येथे उपोषण करणारे रुपनवर आणि बंडगर यांची तब्येत अचानक खालवली. त्यांच्या रक्तातील साखर तसेच रक्तदाब हा अचानक कमी झाल्याने तातडीने नगर वरून पंधरा डॉक्टरांचे पथक त्यांच्या तपासणीसाठी चौंडीमध्ये पाचरण करण्यात आले होते. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे चौंडी येथे यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडकले यांच्या संपर्कात होते.

(Edited By Deepak Kulkarni)

Dhangar Reservation Protest
Tamilnadu Politics : दक्षिणेत कर्नाटकनंतर भाजपला मोठा धक्का ; 'एआयएडीएमके' एनडीएतून बाहेर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com