धुळे, नंदुरबारमध्ये शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार करा !

धुळे, नंदुरबारमध्ये शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे.
Shivsena Dhule Abdul Sattar
Shivsena Dhule Abdul SattarSarkarnama
Published on
Updated on

धुळे : धुळे (Dhule) व नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात शिवसेना (Shivsena) वाढली पाहिजे, असे शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakre) आणि मुख्यमंत्री (Chief Minister) उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) यांचे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे, असे प्रतिपादन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केले.

Shivsena Dhule Abdul Sattar
महापौरांनाही आली जाग... दिले स्मार्टसिटीच्या चौकशीचे आदेश!

धुळे-नंदुरबार जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (ता. २८) मुंबईतील दादर येथील शिवसेना भवनात बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. शिवसेना नेते खासदार संजय राऊत, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, धुळे जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित, हेमंत साळुंखे, नंदुरबार जिल्हाप्रमुख आमशा दादा पाडवी, सहसंपर्कप्रमुख हिलाल माळी, महेश मिस्तरी, शिवसेना उपनेते तथा उत्तर महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर, उपनेते लक्ष्मण वडले, धुळे महानगरप्रमुख सतीश महाले, मनोज मोरे, किरण जोंधळे आदी उपस्थित होते.

पक्षसंघटन वाढवा

धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील पक्षसंघटन आणखी वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी जुन्या आणि नव्या पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, तसेच आगामी निरनिराळ्या निवडणुका पाहता जोमाने कामाला लागावे. त्यात ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत पक्षाची ताकदवाढीची खूणगाठ मनाशी बांधावी, असे राज्यमंत्री सत्तार यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना सांगितले. उपस्थित नेत्यांनीही मार्गदर्शन केले. त्यांनीही पक्षसंघटनावर भर देण्याची गरज व्यक्त केली.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com