Dada Bhuse Politics: हिंदूत्ववादी मंत्री दादा भुसे यांना गेल्या दहा वर्षात मतदारसंघातील अवैध कत्तलखाने कसे दिसले नाही?

Minister Dada Bhuse; Ardent hindutva followers Shivsena Eknath Shinde`s Party Dada Bhuse how ignored Anauthorised slaughter house issue-प्रश्न मंत्री दादा भुसेंच्या मतदारसंघातील अन् लक्षवेधी मांडली नांदेडचे आमदार विक्रात पाटील यांनी , घडले तरी काय?
Dada_Bhuse
Dada_BhuseSarkarnama
Published on
Updated on

Dada Bhuse News : मालेगाव शहरातील अवैध कत्तलखान्यांच्या प्रश्नावर मंगळवारी विधानसभेत गरमा गरम चर्चा झाली. आमदार विक्रांत पाटील यांनी त्यावर लक्षवेधी मांडली होती. त्याबाबत मंत्री उदय सामंत यांनी महापालिकेला कारवाईचे आदेश दिले. अवैध कत्तलखाने बंद करण्याचे आश्वासन दिले.

या प्रश्नावर गेली बारा वर्षे विविध संघटना तसेच स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत. याबाबत आंदोलन करण्यात आले. निदर्शने, धरणे आंदोलन देखील झाले. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून गेले दहा वर्षे मंत्री असलेले दादा भुसे यांच्या नजरेतून हा प्रश्न सुटला असावा. त्यामुळे कोणत्याही शासकीय बैठकीत त्यावर चर्चाच झाली नाही.

या प्रश्नावर नांदेडचे भाजपचे आमदार विक्रांत पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली. या अवैध कत्तलखान्यातील रक्त मिश्रित पाणी थेट नदीत मिसळते. नदी ही हिंदू संस्कृतीत मातेचे स्वरूप आहे. त्यामुळे या प्रकाराने प्रखर हिंदुत्ववाद्यांच्या भावना दुखावल्याने तातडीने गंभीर कारवाई करावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी विधानसभेत केली.

Dada_Bhuse
Prakash Mahajan: अमित ठाकरे घेणार प्रकाश महाजनांची भेट! मनसेत राहणार की जाणार? महाजनांच्या मनात नेमकं काय सुरुए?

आमदार पाटील यांच्या लक्षवेधीवर प्रवीण दरेकर यांनीही पाठिंबा देत काय कारवाई करणार? अशी विचारणा करीत सरकारला घेरले. मोसम तसेच गिरणा नदी या समस्येमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषीीत झाल्याचे आणदार पाटील म्हणाले. मंत्री उदय सामंत यांनी याबाबत तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

विशेष म्हणजे हा प्रश्न प्रखर हिंदुत्वाचा दावा करणाऱ्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि या पक्षाचे मंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघातील आहे. हा प्रश्न उपस्थित झाल्यावर भुसे यांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे तो चर्चेचा विषय बनला आहे. त्यावर मालेगाव शहरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

मालेगाव शहराच्या लगत उभारण्यात येणारे अनधिकृत कत्तलखाने हा गंभीर प्रश्न आहे. या कत्तलखान्यातील रक्त मिश्रित पाणी थेट गिरणा आणि मोसम नदीत सोडले जाते. जनावरांच्या चरबी पासून साबण तयार करण्याचे कारखाने येथे उभे राहिले आहेत. मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे.

संदर्भात आम्ही मालेगावकर संघर्ष समिती आणि विविध संघटनांनी 2012 पासून सातत्याने आंदोलन केले आहे. यासाठी महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयात सातत्याने आंदोलन झाले आहे. विशेष म्हणजे या कार्यकर्त्यांनी अंगाला रक्त फासून या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न यापूर्वी केला आहे.

आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रशासनाने प्रश्न सोडविणे ऐवजी विविध प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती संघटनेचे निखिल पवार तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रश्नावर गेली तेरा वर्ष संघर्ष केला आहे. मात्र गेले पंचवीस वर्ष या परिसराचे आमदार आणि गेली दहा वर्ष मंत्री असलेल्या प्रखर हिंदुत्ववादी दादा भुसे यांना हा प्रश्न कधीच कसा दिसला नाही, असा प्रश्न या संघटनांनी केला आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com