इगतपुरी : शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) संसदेत पक्षाच्या वेगळ्या गटात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज ते आपल्या मतदारसंघात (Nashik) दाखल झाले. यावेळी समर्थकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. यावेळी महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. आदित्य ठाकरे हे आज नाशिकच्या दौऱ्यावर असल्याने शिवसेना येथे बंडखोरांच्या विरोधात आक्रमक असेल, असा अंदाज होता. पण तो गोडसे यांच्या स्वागताच्या झालेल्या गर्दीच्या संख्येवरून फसला. (Shivsena rebel MP Hemant Godse said i was unhappy in Mahavikas Front)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामिल झाल्यानंतर पहिल्यांदाच ते मतदारसंघात येत असल्याने त्यांच्या स्वागताची समर्थकांनी जोरदार तयारी केली होती. शेकडो समर्थकांनी मुंबई आग्रा महामार्गावर इगतपुरी येथे घाटनदेवी मंदिराजवळ गर्दी केली होती. खासदार गोडसे यांनी घाटनदेवीची सपत्नीक आरती केली.
याप्रसंगी समर्थकांनी जल्लोषात फटाक्यांची अतिषबाजी करीत शक्तीप्रदर्शन केली. त्यानंतर रॅली काढण्यात आली. खासदार हेमंत गोडसे यांचे जल्लोषात स्वागत केले. ठाकरे कुटुंबाने स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेत सामिल व्हावे याकरीता घाटनदेवीला साकडे घातले होते असे सांगितले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची संघटना असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाच्या विचाराने जे पाऊल उचलले त्यामागे अनेक आमदार, खासदारसह शिवसैनिक जोडले गेले आहेत. हे सर्व शिवसेनेच्या विचारांवर वाटचाल करतील असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी खासदार गोडसे म्हणाले, गेल्या आठ वर्षापासून या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधीत्व करतो आहे. सातत्यानं विकास कामे हाच आपला ध्यास आहे. राहिलेली विकासकामे निश्चितच पूर्ण करू. अनेक आमदार, खासदार हे फक्त बाळासाहेबांच्या हिंदुत्वामुळेच मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे गेले आहेत. हेच त्यांचे प्रतीक आहे.
काल नाशिकच्या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांनी आपल्या सभेत खासदार हेमंत गोडसे यांच्याबद्दल सांगितले की, आम्ही गोडसे यांना एव्हढं प्रेम दिले, निधी दिला, पावसात प्रचारासाठी फिरलो. मात्र त्यांनी गद्दारी केली, अशी टीका केली होती. त्यावर गोडसे यांनी त्यासाठी आदित्य ठाकरे यांचे आभार व्यक्त केले. महाराष्ट्रात महाविकास आघाडी निर्माण झाली, मात्र ती कुठल्याच आमदार, खासदार यांना रुचली नाही. अनेक दिवसांपासून आमदारांची खद-खद होती. हे पाऊल चुकीचे आहे तरी पण शिवसेना परिवार हा पुन्हा एकत्र यावा अशी घाटनदेवी मातेच्या चरणी प्रार्थना केल्याचे सांगितले.
यावेळी गोडसे समर्थकांच्या शक्तीप्रदर्शन रॅलीत तालुक्यासह जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे काही वेळ मुंबई आग्रा महामार्ग ठप्प झाला होता.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.