Hemant Godse
Hemant GodseSarkarnama

Hemant Godse News : खासदार हेमंत गोडसेंना घरच्या बालेकिल्ल्यात आघाडी राखता येईल?

Nashik constituency 2024 : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मनावर घेतले. त्यामुळे कार्यकर्ते आणि नेत्यांची चंगळ झाली. निवडणुकीतच अनेकांचे प्रवेश सोहळे झाले. त्यादृष्टीने ही निवडणूक वेगळी होती.

Hemant Godse News: नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे खासदार हेमंत गोडसे आणि महाविकास आघाडीचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्यात मुख्य लढत आहे. देवळाली हा खासदार गोडसे यांचा घरचा मतदारसंघ आहे. या होम ग्राउंडवर खासदार गोडसे यांना आघाडी कायम ठेवता येईल का? याची उत्सुकता आहे.

नाशिक मतदारसंघ यंदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना शिंदे गटात अतिशय चुरशीची लढत झाली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मनावर घेतले. त्यामुळे कार्यकर्ते आणि नेत्यांची चंगळ झाली. निवडणुकीतच अनेकांचे प्रवेश सोहळे झाले. त्यादृष्टीने ही निवडणूक वेगळी होती.

लोकसभेच्या 2019च्या निवडणुकीत या मतदारसंघात खासदार गोडसे यांना 80688 मते मिळवून 41,933 मतांनी आघाडीवर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ (Samir Bhujbal) 38,755 अपक्ष माणिकराव कोकाटे 12,937 आणि वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार 26,143 अशी मते होती.

देवळाली विधानसभा मतदारसंघ खासदार गोडसे (Hemant Godse) यांचे होम ग्राउंड आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाने केलेल्या राजकीय खेळीमध्ये प्रामुख्याने हा मतदारसंघ टार्गेट करण्यात आला होता. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी मंत्री बबन घोलप यांसह विविध नेत्यांना शिंदे गटात (Shivsena) प्रवेश देण्यात आला होता. त्याच्या जोरदार बातम्या आणि चर्चा आल्या. महाविकास आघाडीला मानसिक दृष्ट्या खच्ची करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

Hemant Godse
Malegaon City Politics : मालेगावमध्ये राहुल गांधींचे खटाखट.. खटाखट.. डॉ. भामरेंना बसवणार घरी?

प्रत्यक्षात मतांच्या संख्येच्या अंगाने या नेत्यांचे मूल्यमापन केल्यास वेगळीच स्थिती समोर येते. माजी मंत्री बबन घोलप हे विहित गावचे आहेत. येथे 6125 मतदान झाले. विजय करंजकर यांच्या भगूर गावात सहा हजार मतदान झाले. हेमंत गोडसे हे संसरी गावचे असून तेथे 2700 आणि देवळाली कॅम्प येथे 14,500 मतदान झाले. सर्व नेत्यांच्या घरच्या गावातील मतदानाची संख्या 29,325 होते.

परिसरातील गावांमध्ये कार्यकर्त्यांना या स्त्रोतांमार्फत डोळे दिपावे एवढे लक्ष्मी दर्शन झाले. ते मतांमध्ये किती रूपांतरित झाले, हे प्रत्यक्ष मतमोजणीतच दिसेल. या प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते देखील तेवढ्याच जोरकसपणे लढले. शिवसेना ठाकरे गटाचे नवे उपजिल्हाप्रमुख केशव पोरजे यांच्या महापालिका प्रभाग 22 मध्ये 28 हजार, लगतच्या प्रभाग 31 मध्ये 30 हजार मतदान आहे. ही तुलना केल्यास मोठा गाजावाजा झालेल्या नेत्यांच्या घरात मतदान किती आणि त्यात गोडसे यांना आघाडी किती हा आकड्यांचा गुंताच अधिक आहे.

गोडसे गेली दहा वर्ष या माध्यमातून त्यांनी देवळाली मतदारसंघासह परिसरात विविध विकास कामे केली आहे. त्याचा प्रभाव संबंधित गावात नक्कीच झाला आहे. मात्र लोकसभेची निवडणूक राजकीय मुद्दे आणि नेते यावर लढवली जाते. राज्यात शिवसेना ठाकरे गटात फूट पडल्यावर हेमंत गोडसे (Hemant Godse) प्रारंभिक ठाकरे गटातच राहिले. अगदी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची तिरडी देखील काढली होती. मात्र नंतर त्यांनी अचानक एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात प्रवेश केला.

शिवसेना ठाकरे (Shivsena UBT) गटाने या निवडणुकीला गद्दार विरुद्ध खुद्दार असा रंग दिला होता. त्यामुळे गोडसे यांचा पक्षांतराचा निर्णय मतदारांना किती भावला, हे मतदानातून दिसेल. सध्या तरी आपल्या घरच्या मतदारसंघात गेल्या निवडणुकीत मिळविलेली चाळीस हजारांचे आघाडी टिकविणे हे त्यांचे एकमेव राजकीय उद्दिष्ट म्हणावे लागेल. त्यासाठी खासदार गोडसे यांनी अतिशय चांगले नियोजन व प्रचार केला होता. त्यातून त्यांनी शेवटच्या क्षणी वापरलेल्या तंत्राने वातावरण बदलविण्याचा देखील प्रयत्न केला.

Hemant Godse
Lok Sabha Election 2024 : काँग्रेसनं 4 जूनला गुलाल उधळण्याची केली तयारी; कार्यकर्त्यांना केलं आवाहन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com