Shivsena News : शिवसेना चिन्ह, पक्षाबाबत ठाकरे गटाने कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर

Supreme Court Hearing on Shivsena Symbol News : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे.
Supreme Court Hearing on Shivsena Symbol News
Supreme Court Hearing on Shivsena Symbol NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Shivsena News : शिवसेना (Shivsena) पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे.

महत्वाची बाब म्हणजे ही सुनावणी उद्या 15 जुलै रोजी होणार होती. अशातच आता ती सुनावणी कोर्टाने महिनाभर पुढे ढकलली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) एकनाथ शिदेंना शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह देण्याचा निर्णय दिला. आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

याबाबतची सुनावणी 15 जुलै रोजी होणार होती. मात्र आता ती सुनावणी पुन्हा महिनाभर पुढे ढकलण्यात आली आहे. तर आता ही सुनावणी 14 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे चुकीच्या पद्धतीने दिल्याचं ठाकरे गटाने आपल्या याचिकेत म्हटलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या याचिकेवर मागच्या 5 महिन्यांपासून सुनावणी होऊ शकली नाही.

Supreme Court Hearing on Shivsena Symbol News
BJP Vs Congress : धर्मनगरी अयोध्येनंतर बद्रीनाथमध्येही भाजपचा पराभव, 'या' कारणांमुळे मतदारांची काँग्रेसला पसंती

त्यामुळं उद्या होणाऱ्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होत, मात्र आता ही सुनावणी पुन्हा एक महिना पुढे ढकल्याण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना (Shivsena) पक्ष आणि चिन्हाचं भवितव्य एक महिन्यानंतर सुप्रीम कोर्टात ठरणार आहे. तर हा सुनावणी शिंदे गटाला दिलासा तर ठाकरेंसाठी धक्का असल्याचंही बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.