Hiraman Khoskar Politics: आमदार खोसकरांच्या रस्ते विकासावर सरपंचांचेच प्रश्नचिन्ह, केला रास्ता रोको!

Hiraman khoskar politics, Two times on the same road five crores were spent but there were potholes-त्र्यंबक रस्त्यावर सलग दोन वर्ष पाच कोटींचा खर्च तरीही रस्त्यावर प्रचंड खड्डे
Hiraman Khoskar
Hiraman KhoskarSarkarnama
Published on
Updated on

Hiraman khoskar News: काँग्रेसचे बहुचर्चीत आमदार हिरामण खोसकर हे मतदार संघात प्रचंड निधी आणल्याचा दावा करतात. हा निधी आणि त्यातून झालेली विकास कामे यावर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आमदार खोसकर यांच्या मतदार संघातील नाशिक त्रंबकेश्वर हा सर्वात प्रमुख रस्ता आहे. या रस्त्यावर सलग दोन वर्ष पाच कोटी रुपये खर्च झाला. त्यातून डांबरीकरण झाले. हे डांबरीकरण कधी झाले याबाबतच स्थानिक नागरिकांना संशय आहे.

त्याला कारणही तसेच घडले. सध्याच्या पावसात या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. अवघ्या काही महिन्यांपूर्वी कोट्यावधींचे डांबरीकरण झालेल्या डांबरीकरण झालेल्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत.

त्याविरुद्ध परिसरातील सरपंचांनीच आता एल्गार पुकारला आहे. दोन दिवसांपूर्वी या सरपंचांनी रास्ता रोको केला. यावेळी आमदार खोसकर यांना निरोप देऊन बोलवून घेण्यात आले. त्यांना रस्त्याची अवस्था दाखवण्यात आली.

Hiraman Khoskar
Shivsena UBT Politics: नाशिक मध्य मतदार संघ निश्चित करणार महापालिकेची सत्ता?

काँग्रेसचे आमदार खोसकर यांनी यासंदर्भात केलेले विधान अतिशय बोलके होते. या रस्त्याच्या कामाची चौकशी करावी. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. कंत्राटदारांकडून झालेला खर्च वसुल करावा, अशी सरपंचांची मागणी आहे, असे ते म्हणाले.

आमदार खोसकर यांचे याबाबत काय धोरण आहे? याची उत्सुकता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना आणि अधिक्षक अभियंत्यांना याबाबत पत्र देण्यात येईल, असे ते म्हणाले.

मतदारसंघात प्रचंड निधी मिळाल्याचा दावा करणाऱ्या आणि त्यातून विकास कामे झाल्याचे सांगणारे आमदार खोसकर यांच्या विकास कामांचा हा नमुना तर नाही ना? अशी चर्चा आता मतदारसंघात पसरली आहे.

Hiraman Khoskar
Sharad Pawar politics: भुजबळांविरोधात मोर्चेबांधणी, शरद पवार आज भुजबळ विरोधकांना काय कानमंत्र देणार?

नागरिकांनी रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल रास्ता रोको केला. यासंदर्भात याच रस्त्यावरून आमदार खोसकर प्रवास करतात त्यांनी आधीच सार्वजनिक बांधकाम विभागाला त्याबाबत जाब का विचारलं नाही. संबंधित कामाच्या चौकशीसाठी पत्रकार दिले नाही, असे अनेक प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत.

या आंदोलनानंतर खरोखर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अभियंत्यावर कारवाई होईल का? कंत्राटदाराकडून पैसे वसूल होतील का? यावर आमदार खोसकर यांना काय वाटते, ते खरोखर सरपंच व नागरिकांच्या दबावानुसार पाठपुरावा करतात, याची चर्चा सुरू झाली आहे.

इगतपुरी- त्रंबकेश्वर मतदार संघातील रस्त्यांच्या कामाबद्दल अनेक तक्रारी आहेत. आदिवासी आणि दुर्गम भागातील विकास कामांवर झालेला खर्च खरोखर खर्च झाला आहे का? अशीही एक चर्चा खोसकर यांचे विरोधक करीत आहेत.

हे सर्व प्रकार ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घडले आहेत. त्यामुळे आता या कामांच्या चौकशीसाठी आमदार खोसकर यांच्यावर देखील राजकीय दबाव निर्माण झाला आहे. अनेक भागातील नागरिकांच्या या मतदारसंघातील निधीच्या वितरणावर आणि झालेल्या खर्चावर निवडणुकीतच चर्चा घडते की काय अशी स्थिती आहे.

यासंदर्भात झालेल्या रस्ता रोको आंदोलनात रोहित सकाळे, भास्कर लहांगे, निवृत्ती निलके, अजित पवार गटाचे बहिरू मुळाने, बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर, गणेश कोठुळे, सागर लिलके, काशिनाथ बेहरे, संदीप बोडके, सागर चव्हाण आधी पाच ते दहा गावांच्या सरपंचांनी भाग घेतला. या सरपंचांना न्याय मिळतो का याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com