
Honeytrap case : नाशिकचं हनी ट्रॅप प्रकरण राज्यभरात गाजत आहे. त्यातच आता हनी ट्रॅप प्रकरणाचं जळगाव कनेक्शन समोर आलं असून जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातील प्रफुल्ल लोढा याच्यावर 'हनी ट्रॅप' चा गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या लोढाची जवळीक नेमकी कुणाशी यावरुन जळगाव जिल्ह्यात सध्या राजकीय युद्ध सुरु आहे. सुरुवातीला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपच्या नेत्यांचे लोढा सोबत असलेले फोटो व्हायरल केले होते. आता भाजपनेही महाविकास आघाडीच्या नेत्यांचे लोढा सोबत असलेले फोटो व्हायरल केले जात आहे.
जामनेर येथील प्रफुल्ल लोढावर नोकरीचे आमिष देऊन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करत त्यांचे फोटो काढत प्रसारित करण्याची धमकी आणि मुलींना डांबून ठेवल्याचे गंभीर आरोप आहे. या आरोपांवरून मुंबईत साकीनाका पोलीस स्टेशन आणि अंधेरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये पोस्को, बलात्कार, खंडणी यासह हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटकही करण्यात आली आहे. आता तर पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यात प्रफुल्ल लोढा याच्याविरोधात बलात्काराचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रफुल्ल लोढा याचे भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यासोबत सख्य असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. याप्रकरणाची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
संजय राऊत यांनी एक फोटो ट्विट केला आहे. ज्यात प्रफुल्ल लोढा यांना गिरीश महाजन हे पेढा भरवत आहे. या फोटोची चौकशी झाली पाहीजे अशी मागणी राऊत यांनी केली. मात्र त्याला उत्तर म्हणून गिरीश महाजन यांनीही काल माध्यमांशी बोलताना लोढा यांचे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत असलेले फोटो दाखवले. त्यात सुप्रिया सुळे, शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत लोढाचे फोटो असल्याचे सांगत त्यांनी आपल्या मोबाईलमधील ते फोटो दाखवले. लोढा हा फक्त भाजप नाही तर सर्वपक्षीय कार्यकर्ता होता, असं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं आहे.
इतकच नाही तर एकनाथ खडसे यांनी भाजप सोडल्यानंतर लोढा यांनी पत्रकार परिषद घेऊन खडसेंवर केलेल्या गंभीर आरोपांचा व्हिडिओदेखील व्हायरल केला जात आहे. निखिल खडसे यांनी ज्यावेळी आत्महत्या केली, त्यावेळी हाच प्रफुल लोढा काय काय बरगळला होता. खडसेंनीची त्यांच्या मुलाचा खून केला असा आरोप लोढा ने केला होता असा गौप्यस्फोट महाजन यांनी केला. त्यावेळी निखिल खडसे यांच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी प्रफुल लोढा याने केली होती असं महाजन म्हणाले.
दुसरीकडे प्रफुल्ल लोढा यांच्यावर एकापाठोपाठ एक गंभीर गुन्हे दाखल होत आहेत. हनी ट्रॅप आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी मुंबईत लोढावर गुन्हा दाखल आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील बावधन पोलिस ठाण्यात आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे लोढा यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. बावधन येथील प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस मुंबई पोलिसांकडून लोढाचा ताबा घेण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.