Ahmednagar Political News : कोपरगाव मतदारसंघाचा मागील चार वर्षात झालेला विकास पाहता आमदार आशुतोष काळे यांनी केलेली कामगिरी उल्लेखनीय असून त्यांच्या रूपाने उमदं, कर्तुत्वान, गतिमान नेतृत्व लाभले आहे. त्यांनी आता जनतेसाठी कामे करावीत, शासन तुमच्या सोबत असेल याची मी गॅरंटी देतो. कुणाची कशी जिरवायची ते काम माझ्यावर सोडा.
असा इशारा महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे Radhakrishna Vikhe यांनी नाव न घेता काँग्रेस Congress चे बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat आणि विवेक कोल्हे यांना दिला. यातून विखे साधणार काळेंच्या साथीने थोरात-कोल्हेंवर शरसंधान साधत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. आमदार काळेंना ताकत मिळणार असल्याने परंपरागत राजकीय विरोधक कोल्हे यांना नेस्तनाबूत करण्यासाठी आयती संधी मिळत आहे.
कोपरगाव Kopargaon येथे मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून मंजूर विकासकामांचा शुभारंभ आणि भूमीपूजन सोहळा पार पडला. यास विखे यांनी उपस्थिती लावली. या निमित्ताने श्री गणेश कारखान्याच्या निमित्ताने सुरू झालेल्या आमदार थोरात आणि विवेक कोल्हे यांच्या 'सहमती एक्सप्रेस'ला ब्रेक लावण्याचा शुभारंभच विखेंनी केला आहे.
राज्यात थोरात-विखे आणि काळे-कोल्हे राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. तीन पिढ्या सुरू असलेला हा राजकीय संघर्ष आता नवे वळण घेत असून यात आता थोरात-कोल्हे विरुद्ध विखे-काळे असे रूप धारण केल्याचे पुढे येत आहे. यात थोरात यांचे 'टार्गेट' विखे आहेत तर कोल्हेंचे काळे-विखे आहेत. श्री गणेश कारखाना निवडणुक आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
थोरात-कोल्हेनीं विखे यांच्या विरुद्ध त्यांच्या होम ग्राउंड असलेल्या राहाता तालुक्यात मोठे आव्हान उभे केले. दुसरीकडे कोपरगाव मधेही तीन पिढ्या सुरू असलेला काळे-कोल्हे राजकीय संघर्षात विखेंनी काळेंच्या बाजूनं उडी घेतल्याचे आता स्पष्टच झाले असून त्याची प्रचिती या कार्यक्रमातून आली.
Edited By : Amol Sutar
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.