Ahmednagar : राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीचा निकाल रविवारी लागला. नगर जिल्ह्यातील कोपरगाव बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्या गटाने वर्चस्व राखले आहे.
कोपरगाव बाजार समितीच्या निवडणुकीत तीन जागा याआधीच बिनविरोध झाल्या होत्या. तर उर्वरित 15 जागांसाठी रविवारी (दि.30 एप्रिल मतदान पार पडले. त्यानंतर झालेल्या मतमोजणीत आशुतोष काळे, विवेक कोल्हे, राजेश परजणे यांच्या गटाचा सर्व जागांवर दणदणीत विजय झाला.
कोपरगाव बाजार समितीत सत्ताधारी शेतकरी विकास पॅनलच्या 14 उमेदवारांना मतदारांनी मोठ्या फरकाने प्रथम पसंती दर्शवत विजयी केले. तर हमाल मापाडी मतदारसंघातून एका अपक्षाने बाजी मारली. तर याआधीच तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या.
दरम्यान, कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गत निवडणुकीत 'सहमती एक्सप्रेस' धावली होती. त्यानंतर आता देखील कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काळे-कोल्हेंच्या गटला पंसती दिली आहे.
या निवडणुकीत 18 उमेदवारांनी विजय मिळवत कोपरगाव बाजार समितीत पुन्हा एकदा आशुतोष काळे, विवेक कोल्हे, राजेश परजणे यांच्या गटाची सत्ता आली आहे.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.