वारकरी संप्रदायाचा माणुसकी हाच धर्म

धरणगाव येथे ज्ञानाई वारकरी संस्थेच्या वास्तूचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले.
Gulabrao Patil
Gulabrao PatilSarkarnama
Published on
Updated on

धरणगाव : वारकरी (Warkari) संप्रदाय हा माणसात देव शोधतो. माणुसकी (Humanity) धर्म मानतो आणि सर्व जातींचा मेळा करून गुण्यागोविंदाने नांदायचे शिक्षण देतो. हा संदेश सर्वदूर पसरविण्यासाठीच ते कार्यरत असतात, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केले.

Gulabrao Patil
राज ठाकरे ‘एजंट’ चे काम करतात!

धरणगाव येथे ज्ञानाई वारकरी संस्थेच्या वास्तूचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, वारकरी सत्य, सदाचार आणि प्रबोधनाच्या मजबूत पायावर उभे आहे. समाजाला याच प्रबोधनाची गरज आहे. ज्ञानाई वारकरी बहुउद्देशीय संस्था भविष्यात हेच काम करेल. या संस्थेला आपण सर्वतोपरी मदत करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Gulabrao Patil
`एमपीएससी`ची गती, सात वाजता मुलाखती, आठला नियुक्ती!

गुलाबराव वाघ यांनी धरणगाव येथील हिरालाल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली धरणगाव येथे २०१७ पासून संत ज्ञानाई वारकरी बहुउद्देशीय संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून तालुका व परिसरातील बालकांना वारकरी शिक्षणाचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. सध्या ही संस्था धरणगाव येथील लोहार गल्ली परिसरात कार्यरत आहे. बालाजीनगर परिसरात नियोजित जागेत संस्थेची प्रशस्त इमारत उभी करण्याच्या मनोदय संस्थेचे अध्यक्ष हिरालाल महाराज यांचा पूर्ण होताना दिसत आहे, असे श्री.वाघ यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. प्रा. सी. एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले.

पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते ज्ञानाई वारकरी बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले. महामंडलेश्‍वर माधवानंद सरस्वती, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, सिनेट सदस्य प्रा. डी. आर. पाटील, प्रा. सी. एस. पाटील, साहित्यिक प्रा. बी. एन. चौधरी, धानोरा सरपंच भगवान महाजन, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाजन, सुरेश चौधरी, चर्मकार महासंघाचे भानुदास विसावे, गुरूवर्य आर.बी. पाटील यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेला शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी सदाशिव महाराज, कैलास महाराज (टाकरखेडा), ज्ञानेश्वर महाराज (पाळधी), अरुण महाराज (पिंपळे), सुखदेव महाराज, सागर महाराज (भवरखेडा), नाना महाराज, अनिल महाराज, उपनगराध्यक्ष विलास महाजन माजी उपनगराध्यक्ष देविदास बापू महाजन, हरीश मामा डेडिया, कमलेश तिवारी, निंबाजी महाजन, व्ही. टी. माळी, धिरेंद्र पुरभे, विजय महाजन आदी उपस्थित होते.

--

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com