राज ठाकरे ‘एजंट’ चे काम करतात!

गुलाबराव पाटील म्हणाले सभा घेणं हा राज ठाकरे यांचा छंद बनला आहे.
Gulabrao Patil & Raj Thakre
Gulabrao Patil & Raj ThakreSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : सभा घेणं (Public meeting) हा राज ठाकरे (Raj Thakre) यांचा छंद आहे, मात्र त्या सभेचा त्यांना कोणताही फायदा होत नाही, ते केवळ ‘एजंट’ म्हणून काम करतात असा टोला शिवसेना (Shivsena) नेते राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आज लगावला. जळगाव येथे पत्रकारांशी ते बोलत होते.

Gulabrao Patil & Raj Thakre
देशात दहा दिवसांनी ब्लॅकआऊट? प्रल्हाद जोशींनी केला खुलासा

जळगाव येथील शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते, राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेबाबत बोलताना ते म्हणाले की, राज ठाकरे यांना सभा घेण्याचा छंद आहे. मात्र त्यांना यश मिळत नाही. अभ्यास करून परीक्षेत चांगले गुण पडले तर त्या अभ्यासला अर्थ आहे.

Gulabrao Patil & Raj Thakre
भाजपचं धक्कातंत्र : गुजरातचे मुख्यमंत्री रूपानी यांचा तडकाफडकी राजीनामा

श्री पाटील म्हणाले, अनेक सभा घेऊनही निवडणुकीत त्यांचे गुणपत्रक कोरेच असते. त्यांच्याकडे एकही पालिका नाही, त्यांचा केवळ एक आमदार आहे. त्या मुळे त्यांच्या सभेने काहीही फरक पडणार नाही. त्यांचे अकाऊंट कोरेच आहे, बीना पैशाचे अकाउंट दाखविण्यात काहीही अर्थ नाही, जनतेने त्यांना यश दिले पाहिजे.

गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरे यांच्या गेल्या काही दिवसांतील भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, राज ठाकरे हे कोणाचे तरी एजंट म्हणून काम करतात, ते आता कोणाचे एजंट आहेत सर्व जनतेला माहीत आहे. दर पाच वर्षांनी त्यांची भूमिका बदलत असते. पहिली भूमिका काय?, पक्ष स्थापनेची भूमिका काय?, झेंड्याची भूमिका काय?, आता तर झेंड्यात इंजिन घुसले आहे. स्वतःच्या पक्षाची भूमिका बदलवितो त्या माणसाला यश मिळत नाही. ते मिळविण्यासाठी त्यांचा हा खटाटोप सुरू आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com