Shivsena Politics : भाजपने ‘कंत्राटी’ भरतीच्या प्रश्नावर मते मागून दाखवावीत!

If BJP is pure in there intention, they shall ask votes on Contract labour-भाजपने नव्या पिढीला उद्ध्वस्त करण्याचे कारस्थान रचले असल्याने प्रत्येक युवकाने भाजपच्या पराभवाचा निश्चय करावा...
Sunil Bagul
Sunil BagulSarkarnama
Published on
Updated on

Sunil Bagul News : जेव्हापासून देशात भाजपचे सरकार आले आहे, त्यांनी टप्प्याटप्प्याने विविध सेवांचे कंत्राटीकरण केले आहे. ही सर्व कंत्राटी भरती भाजप आपल्या संस्थांमार्फतच करते. त्यात हा पक्ष गब्बर होत आहे, तर बेरोजगार व युवकांची स्थिती दयनीय झाली आहे. (Shivsena`s let it discussion drive will take place from today)

शिवसेनेच्या (Shivsena) होऊ द्या, चर्चा या मोहिमेला आजपासून शहरात (Nashik) सुरुवात होत आहे. त्यात शहर, समाज व युवकांच्या प्रश्नावर राज्य, (Maharashtra Government) केंद्र सरकारने (Centre Government) केलेल्या जनविरोधी कामांवर चर्चा होणार आहे. त्यामुळे शहराचे राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.

Sunil Bagul
BJP Election News : नाशिक मतदारसंघातून खासदार गोडसे उमेदवारीसाठी निश्चित?

सत्ताधाऱ्यांकडून लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून कामांचा गाजावाजा केला जात असतानाच ठाकरे सेनेकडून सरकारी कामे, आश्‍वासनांचा पर्दाफाश करण्यासाठी ‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रमाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.

याबाबत शिवसेनेचे उपनेते, सुनील बागुल म्हणाले, राज्य शासनाने नुकतेच तलाठी ते विविध वरिष्ठ पदांवरील नियुक्त्या कंत्राटी पद्धतीने करण्याचा घेतला आहे. मुंबईत तर साडेतीन हजार पोलिसांची पदेदेखील कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली आहेत. हा समाज, युवक आणि सुशिक्षितांच्या दृष्टीने अतिशय गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे युवकांना हा गंभीर कळला नाही, तर मोठा अनर्थ होईल. त्यांचे भवितव्य संकटात पडेल.

ते पुढे म्हणाले, भाजप जेव्हापासून केंद्रात सत्तेत आले, तेव्हापासून त्यांनी टप्प्याटप्प्याने हा प्रयोग सुरू केला. त्यात नीम्ससारख्या संस्थांसह अनेक संस्थांमार्फत हे काम होत आहे. त्यात या संस्था गब्बर झाल्या, तर बेरोजगार, शिक्षित युवक, कामगार देशोधडीला लागले. त्यांचे शोषण होत आहे. त्याचा व्यवस्थेला खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

युवकांनी हे समजून घ्यावे. कारण त्यांना कोणताही कायमस्वरूपी रोजगार, नोकरी मिळणार नाही. आर्थिक स्थिरता नसेल. कौटुंबिक वातावरण बिघडेल. त्यामुळे युवकांनी हे संकट स्वतः समजून घ्यावे, इतरांना सांगावे व भाजपला सत्तेतून ताबडतोब घरी पाठवावे, ही समाजातील प्रत्येक घटकाची राष्ट्रीय जबाबदारी आहे.

Sunil Bagul
NCP & Chhagan Bhujbal News : छगन भुजबळ म्हणतात, ‘नाशिकचे मैदान सोडणार नाही’

ठाकरे गटाकडून १ ते १२ ऑक्टोबर कालावधीत दररोज सायंकाळी सहा ते आठ वेळेत शहरातील विविध चौकात ‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रम आयोजित केला आहे. दरवाढ, सरकारी कंपन्यांचे खासगीकरण, करांची वाढ, शिवस्मारकाचा रेंगाळलेला प्रश्‍न, काळे धन, दाऊदला फरफटत आणण्याची घोषणा, स्मार्ट सिटीचा गलथानपणा, महागाई, शेतकऱ्यांवरील अन्याय आदी विषयांवर लोकांमध्ये जाऊन चर्चा घडवली जाणार आहे.

चौक सभांमध्ये शिवसेना उपनेते बबन घोलप, सुनील बागुल, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी महापौर विनायक पांडे, माजी आमदार वसंत गिते, माजी गटनेते विलास शिंदे उपस्थित राहणार आहेत.

Sunil Bagul
Sharad Pawar News : समतेचा, माणुसकीचा संदेश घराघरांमध्ये पोहाेचवणं गरजेचं : शरद पवार; भागवत वारकरी संमेलनास सुरुवात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com