Sanjay Raut; नारायण राणे यांनी सांगावे, तीथे यायला तयार आहे!

राणे यांच्यावर ज्या पक्षाचे संस्कार आहेत, ते तर सगळ्यांचा एकेरीच उल्लेख करतात.
Sanjay Raut & Narayan Rane
Sanjay Raut & Narayan RaneSarkarnama

नाशिक : नारायण राणे (Narayan Rane) जर चॅलेंज करत असतील तर सांगावे, मी कुठे येऊ. मला विचारणारे ते कोण आहेत. माझ्या पक्षासाठी (Shivsena) मी संकटात उभा राहिलो. मात्र मी पक्ष बदलला नाही, अन् गुडघे देखील टेकले नाही. मी न्यायालयात (High court) सामोरे गेलो आणि लढलो, असे प्रत्युत्तर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नारायण राणेंना प्रत्युत्तर दिले. (Shivsena leader Sanjay Raut give hard reply to BJP leader Narayan Rane)

Sanjay Raut & Narayan Rane
Sanjay Raut; तर मुख्यमंत्र्यांनी दारावर लाथ मारून राज्यपालांना जाब विचारला असता!

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या फेब्रुवारी महिन्यात नाशिक दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांची गोल्फ क्लब मैदानावर सभा होणार आहे. या सभेच्या नियोजनासाठी खासदार राऊत आज नाशिकला आले. दोन दिवसांच्या दौऱ्यात ते पक्षाच्या संघटनात्मक बांधणीबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

Sanjay Raut & Narayan Rane
Film City महाराष्ट्रातच राहिल आणि निर्माते दिग्दर्शकही इतर राज्यांत जाणार नाहीत...

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राऊत यांच्यावर आगपाखड केली होती. त्याबाबत विचारले असता, त्यांनी राणेंचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, आजवर मी कधीही कोणाचा एकेरी उल्लेख केलेला नव्हता. मात्र नारायण राणे यांनी डिवचल्याने मला त्यांना उत्तर द्यावं लागलं. त्यानंतर त्यांनी मला ओळखणं बंद केले आहे. ते तर छत्रपती शिवरायांचा उल्लेख देखील एकेरी करतात. हे त्यांचे संस्कार आहेत. आम्ही मात्र संयम राखला, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले.

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या संदर्भात ते म्हणाले, कचऱ्याला आग लागते, मग धूर येतो. तशी अवस्था या खासदारांची झाली आहे. हे खासदार परत निवडून येणार नाहीत. त्यांनी कितीही पाचोळा गोळा करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते पुन्हा निवडून येणार नाहीत.

मुख्यमंत्री शिंदे यांच्याबाबत ते म्हणाले, समद्धी महामार्गाचे पैसे, ठेकेदारीचे पैसे यातून पक्ष उभा राहत नाही. शिवसेना असा पक्ष आहे, तो रक्त, घाम आणि त्यागातून उभा राहिला आहे. त्याला मोठा वारसा आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ज्वलंत विचार आहे. कोणीही आणि कितीही आले तरी शिवसेनेला टक्कर देऊ शकणार नाही.

आतापर्यंत मी कधीही कोणाचा एकेरी उल्लेख केलेला नव्हता. मात्र राणे यांनी डिवचलं आणि मला सकाळी उत्तर द्यावं लागलं. त्यानंतर त्यांनी मला ओळखणं बंद केले आहे. आपल्यावर संस्कार छत्रपती शिवरायांचे आहेत. त्यामुळे आमच्या नादाला लावू नका. नारायण जर चॅलेंज करत असतील, तर सांगा मी कुठे येऊ, तुम्ही कोण आहात मला विचारणारे?. माझ्या पक्षासाठी मी संकटात उभे राहिलो, पण मी पक्ष बदलला नाही किंवा गुडघे देखील टेकले नाही, अशा शब्दात त्यांनी नारायण राणेंना प्रत्युत्तर दिले.

उद्धव ठाकरे यांची नाशिकला सभा

नाशिक हा शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र आजच्या घडीला असंख्य कार्यकर्त्यानी शिंदे गटात प्रवेश केल्याने अवस्था बिकट झाली आहे. हेच डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः नाशिकच्या मैदानात उतरणार आहेत. नाशिक शहरातील गोल्फ क्लब मैदानात हि सभा होण्याचे निश्चित झाले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार राऊत आज नाशिक दौऱ्यावर आले आहेत. तत्पूर्वीच शुक्रवारी पन्नासहून अधिक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे त्याची विशेष चर्चा झाली. यामुळेच शिंदे गटाकडून ठाकरे गटाला नवीन भगदाड पडले आहे. नाशिकचे जवळपास 50 पदाधिकारी कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com