Eknath Khadse Lok Sabha Candidate : एकनाथ खडसे जळगावमधून राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार ; जयंत पाटील यांचे स्पष्ट संकेत

NCP Jalgaon Sabha : ते गेली २५ ते ३० वर्षे जळगावमधून भाजपच्या लोकसभेच्या दोन्ही जागा निवडून याव्यात, यासाठी प्रयत्न करायचे.
Jayant Patil-Eknath Khadse
Jayant Patil-Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातून लोकसभेसाठी कोण, असा सवाल आमच्या सर्वांच्या मनात येत आहे. नाथाभाऊ, हे शिवधनुष्य आता तुम्हीच उचललं पाहिजे, असं माझ्यासारख्याला वाटतं. तुम्ही २५ ते ३० वर्षे भाजपचे दोन दोन खासदार निवडून दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही आता राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी निश्चितपणे शिवधनुष्य उचललं पाहिजे, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ खडसे हे जळगावमधून लोकसभेचे उमेदवार असतील असे संकेत दिले. (Eknath Khadse NCP's Jalgaon Lok Sabha candidate: Jayant Patil's clear indication)

जळगाव जिल्ह्यात शरद पवार यांची आज (ता. ५ सप्टेंबर) जाहीर सभा झाली. त्या सभेत आमदार जयंत पाटील बोलत होते. माजी मंत्री पाटील म्हणाले की, एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष रुजवला आहे. ते गेली २५ ते ३० वर्षे जळगावमधून भाजपच्या लोकसभेच्या दोन्ही जागा निवडून याव्यात, यासाठी प्रयत्न करायचे. आज नाथाभाऊ हे शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करीत आहेत.

Jayant Patil-Eknath Khadse
Jayant Patil Speech : तुम्हाला न विचारताच लाठीजार्च होत असेल तर सरकारमध्ये तुम्ही काय करताय?; जयंत पाटलांचा सवाल

आता जळगाव जिल्ह्यातून येणाऱ्या लोकसभेसाठी कोण?, असा सवाल आमच्या सर्वांच्या मनात येत आहे. नाथाभाऊ, हे शिवधनुष्य आता तुम्हीच उचललं पाहिजे, असं माझ्यासाख्याला वाटतं. तुम्ही २५ ते ३० वर्षे भाजपचे दोन दोन खासदार निवडून दिलेले आहेत. त्यामुळे शरद पवारांची अशी अपेक्षा आहे की, जळगाव जिल्ह्याने १९८५ मध्ये सातच्या सात आमदार निवडून देऊन शंभर टक्के रिझल्ट देण्याचे काम केलेले आहे. ही या जिल्ह्याची परंपरा आहे, त्यामुळे मला खात्री आहे की, तुम्ही या जिल्ह्यात लोकसभेसाठी निश्चित शिवधनुष्य उचललं पाहिजे. पण जळगाव जिल्ह्यातील अधिकाधिक आमदार हे महाविकास आघाडीचे कसे निवडून येतील, हे बघण्याचे काम तुम्हा, आम्हाला आणि सर्वांना करायचे आहे, अशी अपेक्षाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

Jayant Patil-Eknath Khadse
Jalgaon Sabha : सुप्रीम कोर्टाचे दोन निर्णय दोन महिन्यांत फिरवता अन्‌ मराठा आरक्षणासाठी ५० टक्क्यांचे कारण देता; आव्हाडांचा भाजपला सवाल

वळसे पाटलांना जोरदार टोला

आमच्यातून बाहेर गेलेली लोकं शरद पवार यांच्या कर्तृत्वावर सवाल करायला लागले आहेत. ज्यावेळी शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, तेव्हा स्वतःच्या जिवावर आणि कर्तृत्वावर मुख्यमंत्री झाले. त्यानंतर एकूण चार वेळा ते मुख्यमंत्री झाले आहेत. पवार साहेबांच्या सोबत होता, तेव्हा तुम्हाला या गोष्टी सूचल्या नाहीत. पण, जाताजाता एवढच सांगेन. ‘जिस स्कूलमें आप अभी अभी दाखिल हुए है. उस स्कूल के प्रिन्सिपलभी पवारसाहब के पास ट्यूशन लेते है,’ त्यामुळे कुठल्या शाळेत जायचं, याचा तरी अभ्यास करायचा होता, असा टोला जयंत पाटील यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना लगावला.

Jayant Patil-Eknath Khadse
Sharad Pawar On Parliament Session : मोदींनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले, मात्र खासदारांना कोणताही अजेंडा दिला नाही; शरद पवारांचा आरोप

पन्नास टक्के शेतकऱ्यांचा कापूस आज घरात

ते म्हणाले की, कापसाला केंद्र सरकारने ६६२० रुपये आधारभूत किंमत जाहीर केली. ही शेतकऱ्यांना परवडणारी नाही. आज कापसाला ७ हजार ते ८ हजार रुपयांपर्यत दर मिळत नाही. मात्र, आमच्या सरकारच्या काळात कापसाला साडेबारा ते तेरा हजार रुपये दर मिळत होता. दर खाली आल्याने ५० टक्के शेतकऱ्यांनी कापूस घरी ठेवला आहे. या शेतकऱ्यांना आशा आहे की, कधी ना कधी कापसाचे दर वाढतील आणि आपल्याला चार पैसे मिळतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com