Dnyaneshwari Ghat Naming : 'इमामपूर घाट'चा झाला 'ज्ञानेश्वरी घाट'; माजी मंत्री शंकरराव गडाख यांची नवी 'राजकीय विनिंग'?

Imamapur Ghat Renamed Dnyaneshwari Ghat During Ashadhi Wari : अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील इमामपूर घाटाचे ज्ञानेश्वरी घाट, असे नामांतर माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत होताच, त्यांच्या नवीन राजकीय विनिंगची चर्चा सुरू झाली आहे.
Dnyaneshwari Ghat Naming
Dnyaneshwari Ghat NamingSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा येथून आषाढी वारीसाठी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करत असतानाच, अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नगर-नेवासा तालुक्याला जोडणाऱ्या इमामपूर घाटाचे 'ज्ञानेश्वरी घाट' असे नामकरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे प्रमुख तथा माजी मंत्री शंकरराव गडाख उपस्थित होते.

या नामकरणासाठी स्थानिक स्तरावर काही काळापासून मागणी होत होती. पालखी प्रस्थानाच्या मुहूर्तावर झालेल्या कार्यक्रमात दिंडीचे प्रमुख देविदास म्हस्के महाराज आणि शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांच्या पुढाकारातून घाटाच्या नव्या नावाची घोषणा करण्यात आली. यापुढे हा घाट 'ज्ञानेश्वरी घाट' या नावाने ओळखला जाणार आहे.

अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर (Ahilyanagar), असे नामकरण झाल्यानंतर जिल्ह्यातील काही गावांतील आणि सार्वजनिक ठिकाणांच्या नावांबाबतही विविध स्तरांवर मागण्या पुढे येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर इमामपूर घाटाच्या नामांतराकडेही लक्ष लागले होते.

Dnyaneshwari Ghat Naming
Durga Tambe Privilege Motion : दुर्गा तांबेंच्या वक्तव्यावरून वाद; आमदार अमोल खताळ यांचे विधानसभेत हक्कभंग कारवाईसाठी निवेदन

दरम्यान, या कार्यक्रमानंतर शंकरराव गडाख यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत स्थानिक पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी नेवासा मतदारसंघात पुन्हा सक्रिय हालचाली सुरू केल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

Dnyaneshwari Ghat Naming
Lahamate Viral Video : अकोल्यात युवकाला बेदम मारहाण; आमदार लहामटे यांच्या स्वीय सहायकाचा CCTV व्हिडिओ चर्चेत

नेवासा नगरपंचायत निवडणुकीत शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाने 17 पैकी 10 जागांवर विजय मिळवत महायुतीला आव्हान दिले होते. मात्र नगराध्यक्षपद मिळवण्यात पक्षाला यश आले नाही. त्यानंतर मुळा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतही गडाख यांच्या गटाने वर्चस्व कायम ठेवले.

गडाखांच्या राजकीय भूमिकेबाबत चर्चा

अहिल्यानगर जिल्ह्यातील बदलत्या राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर या नामकरणाकडेही विविध स्तरांतून पाहिले जात आहे. जिल्ह्यात महायुतीचे वाढते राजकीय वर्चस्व, स्थानिक सामाजिक-राजकीय घडामोडी आणि गडाख यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. मात्र यासंदर्भात गडाख यांनी कोणतीही अधिकृत राजकीय भूमिका जाहीर केलेली नाही.

शरद पवार मार्गदर्शनाच्या भूमिकेत?

राजकीय वर्तुळात शंकरराव गडाख यांचे मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव घेतले जाते. आगामी काळातील त्यांच्या राजकीय निर्णयांबाबत विविध अंदाज व्यक्त केले जात असले, तरी त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

नामकरणावेळी वारकऱ्यांचा जल्लोष

दरम्यान, देविदास म्हस्के महाराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ज्ञानेश्वरी घाट' नामकरण कार्यक्रमावेळी सुमारे 15 हजार वारकरी दिंडीत सहभागी झाले होते. पंढरपूरच्या दिशेने पुढे आणखी दिंड्या सहभागी होणार असून, वारकऱ्यांची संख्या 30 ते 40 हजारांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com