Ram Shinde Vs Rohit Pawar : 'या' निवडणुकीत त्यांना 'पाणीच पाज'; आमदार राम शिंदेंचं गणरायाला साकडं

BJP MLA Ram Shinde criticizes MVA And MLA Rohit Pawar : भाजप आमदार राम शिंदे यांनी 'मविआ' आणि आमदार रोहित पवार यांच्यावर तोफ डागली.
Ram Shinde Vs Rohit Pawar
Ram Shinde Vs Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : भाजप आमदार प्रा. राम शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी कर्जत-जामखेड मतदार संघात पेरणी सुरू केली. विधान परिषद सदस्य असल्याने त्यांनी ही निवडणुकीची जाहीरपणे इच्छा व्यक्त केली नसली, तरी मतदार संघातील त्यांचा वाढलेला वावर सगळं स्पष्ट करतो.

अलीकडं त्यांनी आमदार रोहित पवारांना थेट, आव्हान देणं देखील सुरू केलं आहे. अलीकडच्या काळात कर्जत-जामखेड मतदार संघातील बॅनरबाजी आणि राजकीय उलथापालथींवरून आमदार पवार यांच्यावर तोफ डागली.

कर्जतमध्ये 'मान नात्याचा..भाऊ बहिणीचा', या रक्षाबंधनाचा कार्यक्रम आमदार राम शिंदे यांच्या उपस्थित झाला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या विरोधावरून महाविकास आघाडीवर आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची मतदार संघातील बॅनरबाजीवर जोरदार टीका केली.

Ram Shinde Vs Rohit Pawar
Sanjay Shirsat Politics: संजय शिरसाट का संतापले?, कोणाला म्हणाले बिनडोक!

(BJP) आमदार राम शिंदे म्हणाले, "लोकप्रतिनिधींनी सोन्याचा चमचा घेत, जन्म घेतला. त्यांनना संघर्ष काय कळणार. आमच्या बापानं एकाच माणसाकडे साल घातले. त्यामुळे सन्मान काय आहे, हे आपण चांगले जाणतो. आजतागायत कधीच कोणाला घालून पाडून बोललो नाही. मात्र आता सगळे उलटे होत आहे. ज्यांनी समोरच्यावर उपकार केले. ज्या लोकांनी त्याला निवडून आणले. त्या सर्वांचा अपमान केला जातोय".

फ्लेक्समधून कोणाला छत्र्या, पावसाळ्यातील बेडकं, अशा उपमा लावण्याचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे देवा गणराया यंदा ज्यांनी तुला बसल्यापासून पाणी पाजलं नाही, त्यांना या निवडणुकीत पाणी पाज, असं साकडं, राम शिंदे यांनी रोहित पवार यांचं नाव न घेता गणरायाला घातलं.

Ram Shinde Vs Rohit Pawar
Shivsena UBT Politics: मनमाड-इंदूर रेल्वेच्या श्रेय वादात ठाकरे गटाची उडी, म्हणाले, खरे श्रेय...

चांगली योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले

"मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू झाली, या योजनेचे सर्वांनी स्वागत केले. मात्र महाविकास आघाडीच्या पक्षांनी या योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न केला. चांगली योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले, अशी दुटप्पी भूमिका या लोकांची आहे. मात्र माझ्या लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, तुम्हाला कसलीही अडचण येऊ द्या, केव्हाही फोन करा, तुमचा हा 'रामभाऊ' तुमचा 'सख्खा भाऊ' म्हणून सदैव तुमच्या मदतीला धावून येईल. मी सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील. आपण मतदारसंघात अनेक विकासकामे केली. मात्र त्याचा कधी ही गाजावाजा केला नाही. कारण ते आपले लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य होते", असंही आमदार राम शिंदे यांनी म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com