Shivsena UBT Politics: मनमाड-इंदूर रेल्वेच्या श्रेय वादात ठाकरे गटाची उडी, म्हणाले, खरे श्रेय...

Shivsena- BJP politics, Manmad- Dhule- Indore railway, Why no approval when Bhamre is MP-शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी भाजप आणि राजकीय नेत्यांना चांगलेच फटकारले
Dr Subhash Bhamre & Hilal Mali
Dr Subhash Bhamre & Hilal MaliSarkarnama
Published on
Updated on

Hilal Mali News: मनमाड- धुळे- इंदूर रेल्वे मार्गाला नुकतीच मंजुरी मिळाली. त्यानंतर सबंध धुळे जिल्ह्यात राजकीय नेत्यांमध्ये त्यावरून श्रेयवाद सुरू झाला आहे. भाजपने स्वतःची पाठ थोपटून घेण्यास सुरुवात केली आहे.

मनमाड- धुळे- इंदूर रेल्वे मार्गाच्या योजनेचे श्रेय कोणाला? यावरून राजकीय नेत्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे. यात भाजपचे माजी खासदार डॉ सुभाष भामरे सर्वात पुढे आहेत. आता शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनीही त्यात उडी घेतली आहे.

भाजप नेत्यांना शिवसेना ठाकरे गटाचे माळी यांनी चांगलेच फैलावर घेतले. डॉ भामरे खासदार असताना या योजनेला मंजुरी का मिळाली नाही? खासदारकी संपल्यानंतर योजनेला मंजुरी मिळाली आहे. त्याचे श्रेय डॉ भामरे कसे घेऊ शकतात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

श्री. माळी यांनी मनमाड- धुळे- इंदूर रेल्वे मार्गाचा प्रश्न अनेक वर्ष सुरू होता. तो प्रश्न जिवंत ठेवण्याचे काम धुळ्याच्या अनेक संघटना आणि नेत्यांनी केले. यासंदर्भात माजी आमदार ग. द. माळी यांनी हा रेल्वेमार्ग उपयुक्त कसा आहे, याचा अभ्यास करून अहवाल सादर केला होता.

Dr Subhash Bhamre & Hilal Mali
Girish Mahajan: नाथाभाऊ आता काय करणार? गिरीशभाऊंनी थेट पुरावेच मागितले!

धुळे शहरातील खंडेराव बाजार मनमाड इंदूर रेल्वे संघर्ष समितीने अनेक वर्ष आंदोलन करून हा विषय जिवंत ठेवला. माजी आमदार अनिल गोटे यांनी मला आमदार करा, रेल्वे आणतो अशी घोषणा केली होती. आमदार गोटे यांनी १५ वर्ष या प्रश्नावर विविध स्तरावर पाठपुरावा केला.

श्री. गोटे यांसह विविध नेत्यांनी या प्रश्नावर आंदोलन केले. त्यात धुळ्याच्या नागरिकांचा मोठा सहभाग होता. या सहभागामुळेच हा प्रश्न जिवंत राहिला. या आंदोलनातूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यात सरकार होते. तेव्हा त्याला सहमती मिळाली.

महाराष्ट्र सरकार या प्रकल्पासाठी ५५ टक्के सहभाग देईल. ४५ टक्के सहभाग मध्य प्रदेश सरकार देणार, असे धोरण ठरले होते. त्यातूनच हा रेल्वे मार्ग प्रत्यक्षात येऊ शकला. कोणताही मोठा प्रकल्प एका दिवसात अथवा एका व्यक्तीच्या पाठपुराव्याने प्रत्यक्षात येत नाही.

Dr Subhash Bhamre & Hilal Mali
Devendra Fadnavis: फडणवीस बरसले, महाविकास आघाडीला म्हणाले, 'तोंड' वर करून निवडणुकीत येतात"

डॉ भामरे खासदार असताना त्यांनी याबाबत पाठपुरावा केला. मग त्यांच्या कार्यकाळात ते खासदार असताना हा प्रकल्प मंजूर कसा झाला नाही, असा प्रश्न शिवसेना नेते माळी यांनी केला. त्यांनी काँग्रेसच्या खासदार डॉ शोभा बच्छाव यांनाही कानपिचक्या दिल्या आहेत.

खासदार डॉ बच्छाव यांनी तीन चार महिन्यांपूर्वी रेल्वे मंत्र्यांना निवेदन दिले होते. त्या निवेदनाने एवढा मोठा अठरा हजार कोटींचा प्रकल्प मंजूर होऊ शकतो का? याचाही विचार करण्याची गरज आहे. मनमाड- धुळे- इंदूर रेल्वे मार्ग मंजूर करण्याबाबतचे श्रेय धुळ्याच्या नागरिकांना जाते.

अन्य नेते आणि लोकप्रतिनिधींनी राजकीय लुडबुड करून त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. या रेल्वे प्रकल्पाचे खरे श्रेय कोणाला हे आगामी विधानसभा निवडणुकीतून मतदाराच स्पष्ट करतील. त्यामुळे राजकीय नेत्यांनी विनाकारण या प्रकल्पाचे श्रेय घेण्यासाठी धडपड करू नये. अशा नेत्यांना जनता आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील माळी यांनी दिला आहे.

हा रेल्वे प्रकल्प धुळे जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. गेली ३५ वर्ष त्यासाठी विविध लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांनी पाठपुरावा केला. यासंदर्भात रस्त्यावरच्या आंदोलनापासून तर थेट राष्ट्रपती पर्यंत लढा देण्यात आला. आता हा प्रकल्प प्रत्यक्ष साकारला आहे. त्यामुळे अनेकांनी त्याचे श्रेय घेण्यासाठी धडपड सुरू केली आहे.श्रेयवादाची लढाई आता राजकीय संघर्षाचे स्वरूप होण्याची चिन्हे आहेत.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com