देगलूरच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झालेच पाहिजे!

देगलूर- बिलोली विधानसभा पोटनिवडणुकितील महाविकास आघाडीच्या जितेश अंतापुरकर यांची प्रचारसभा झाली.
NCP leader Chhagan Bhujbal
NCP leader Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

देगलूर : राज्यात असलेले महाविकास आघाडी (Mahavikas Front Government) सरकार हे मजबुतीने उभे आहे. आम्हीच देगलुरच्या विकासासाठी कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Food & Supply Minister Chhagan Bhujbal) यांनी केले.

देगलूर- बिलोली विधानसभा पोटनिवडणुकितील महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापुरकर यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

NCP leader Chhagan Bhujbal
`प्राप्तिकर` छाप्यात कांदा व्यापाऱ्यांकडे २५ कोटींची रोकड, १२५ कोटींची मालमत्ता!

यावेळी ते म्हणाले, ही सभा मला मोठ्या दुःखद अंतकरणाने घ्यावी लागत आहे. कै. रावसाहेब अंतापुरकर यांनी कोरोना काळात सर्व सामान्यांची सेवा केली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कोरोनाकाळात देखील त्यांचे जनसेवेचे काम चालू होते. त्यातच त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. आता जी निवडणूक होणार आहे त्यात रावसाहेबांचा मुलगा जितेश हा महाविकास आघाडीतर्फे उभा आहे. जितेश हा उच्च शिक्षित आहे. आपले शिक्षण पूर्ण करून तो स्वतःच्या पायावर उभा होता. मात्र दुर्दैवाने रावसाहेबांचा मृत्यू झाला आणि जितेशला निवडणुकीत भाग घ्यावा लागला. आता आपली जबाबदारी आहे, त्याला विजय केले पाहिजे.

NCP leader Chhagan Bhujbal
ईडी, सीबीआय, आयटी, एनसीबी नंतर सरकार पाडायला आर्मी बोलावणार का?

ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार योग्य पद्धतीने काम करत आहे. कोरोना काळात भाजपचे सरकार ज्या राज्यात आहे त्या उत्तर प्रदेश, आणि बिहारची परिस्थिती तुम्हाला माहीत आहे. त्याच्या कित्येक पटीने चांगले काम महाराष्ट्र राज्याने केले आहे.

देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या या पोटनिवडणुकीत सर्वांनी आपसातले वाद मिटवत एकत्र आले पाहिजे. भाजपच्या उमेदवाराचे डिपॉझिट कोणत्याही परिस्थितीत जप्त झाले पाहिजे असे आवाहन श्री. भुजबळ यांनी देगलूर वासीयांना केले.

यावेळी उमेदवार श्री. अंतापूरकर, खासदार हेमंत पाटील, शिवसेनेचे संपर्कप्रमुख विश्वनाथ नेरुळकर, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, आनंद जाधव, अनुरुद्ध वनकर, मोगलाजी शिरशेटवार, बापूसाहेब भुजबळ, मकरंद सावे यांसह मतदारसंघातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com