Chhatrapati Sambhajinagar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात आज महायुतीचा मेळावा पार पडला. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही या मेळाव्याला हजेरी लावत खास आपल्या शैलीत भाषण केले. महायुतीच्या मेळाव्यात आठवलेंच्या टोलेबाजीने सगळ्यांचेच मनोरंजन केले. महायुतीने महाराष्ट्रात हाती घेतलेल्या 'मिशन-48' वर आठवले यांनी चांगलीच गुगली टाकली. 'मिशन 48' कशाला ? काही जागा त्यांना राहू द्या, असे म्हणत त्यांनी उपस्थितांची फिरकी घेतली.
तुम्ही नरेंद्र मोदी यांना कितीही शिव्या द्या, पण पुन्हा तेच पंतप्रधान होणार, असा दावाही आठवले यांनी केला. आमचे लोक माझ्यावर टीका करतात, तुम्ही इकडे का गेले ? पण इकडे नको जाऊ तर तुमच्यासारखा उपाशी राहू का ? ज्या काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दोनवेळा निवडणुकीत पराभूत केले. मलाही एकदा शिर्डीतून पाडले, पण मी जास्त दिवस पडलो नाही, पुन्हा उभा राहिलो, असे म्हणत काँग्रेसवर टीका केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
व्यासपीठावर उपस्थितीत पालकमंत्री संदीपान भुमरे यांचा उल्लेख करत ते रोजगार हमी मंत्री आहेत. आघाडी सरकारमध्ये असतांना शरद पवारांनी माझ्याकडेही हे खाते होते. सोबत दारुबंदी खातेही मला दिले होते. पण मी सांगतिले मला दारुबंदी खाते नको, कारण दारु बंदच होत नाही, तर मग खाते घेऊन काय उपयोग ? असा टोलाही आठवले यांनी लगावला.
पंतप्रधान मोदी यांच्यावर ते संविधान बदलणार असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जातो. याचाही उल्लेख आठवले यांनी आपल्या भाषणात करत काँग्रेसला टोला लगावला. मोदी काँग्रेसला बदलतील, राहुल गांधींना बदलतील, संविधान कसे बदलतील, असे म्हणत आठवले यांनी धमाल उडवून दिली. जब तक रहेगी मोदी की आंधी, कसे होणार राहुल गांधी प्रधान मंत्री, अशी कविताही आठवले यांनी रचली.
मागच्यावेळी भाजपला 303 जागा मिळाल्या होत्या, आता चारशे पार जागा मिळतील. माझ्यावर राहुल गांधीला आऊट करण्याची जबाबदारी असल्याचे आठवले म्हणाले. अब्दुल सत्तार हे गांधी टोपी घातलेले ते खरे राष्ट्रवादी मंत्री आहेत, असा टोलाही आठवले यांनी त्यांना लगावला. छत्रपती संभाजीगनरची जागा यावेळी आपली निवडून येणार. ज्या कुणाला उमेदवारी मिळेल त्याच्या पाठीमागे आमची आंबेडकरी जनता ठामपणे उभी राहणार,अशी ग्वाही आठवले यांनी यावेळी दिली.
(Edited By- Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.